बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवसेनापक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी अधिकृतपणे शिवसेना प्रवेश केला असल्याने बार्शी तालुक्यातील राजकिय वातावरण तापले आहे.
सोमवारी दि.१६ रोजी सकाळी मातोश्री येथे भेट घेतांना शिवसेनेचे संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरुरकर, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरुण बारबोले, बाबासाहेब कापसे, विनोद काटे, अशोक सावळे आदी उपस्थित होते.
राजेंद्र राऊत यांनी यापूर्वी शिवसेना पक्षाच्या तिकीटावर नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा आदी निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. मधल्या काळात त्यांनी नारायण राणे, विलासराव देशमुख यांच्या संपर्कातून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मागील महिन्यांत गोपीनाथ मुंढे यांच्या संपर्कात असतांना नारायण राणेंसह भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा जोरात सुरु होती परंतु मुंढे यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. लोकसभेच्या निवडणूकीत स्वत: पुढे न येता शिवसेनेला संपूर्ण मदत व प्रचार करण्याची राजेंद्र राऊत यांची भूमिका पुढील राजकिय पार्श्वभूमिचे संकेत देऊत गेली. शिवसेनेचे काम करणार्या भाऊसाहेब आंधळकर व राजेंद्र मिरगणे यांच्यातील वादामुळे बार्शीतील शिवसेनेचे वातावरण ढवळून निघाले होते. यात अनुभवी राजकारणी व कॅबीनेटमंत्री दिलीप सोपल यांचे परंपरागत राजकिय शत्रू म्हणून नावलौकीक असलेल्या राजेंद्र राऊत यांचा शिवसेनेतील प्रवेशाने बार्शी तालुक्यातील राजकिय समीकरणे बदलली आहेत. सदरच्या बदलामुळे राष्ट्रवादीतील दावेदार दिलीप सोपल, शिवसेनेतील दावेदार बनलेल्या आंधळकर व मिरगणे यांच्यात राजेंद्र राऊत यांचे राजकिय भवितव्य धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु शिवसेना पक्षात त्यांनी केलेल्या प्रवेशानंतर केवळ राजेंद्र राऊत हे शिवसेनेतून आणि राष्ट्रवादी किंवा अपक्ष तिकीटावर दिलीप सोपल या परंपरागत उमेदवारांमध्ये विधानसभेची लढत होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.