उस्मानाबाद -: औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक-2014 साठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण शनिवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडले. पदवीधर विधानपरिषद निवडणूकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी घ्यावयाची काळजी, सूचना यावेळी देण्यात आल्या.
उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रभोदय मुळे, तहसीलदार सुभाष काकडे, तहसीलदार वैशाली पाटील, रामहरी गोरे, नायब तहसीलदार (निवडणूक) वाघमारे आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी मुळे आणि काकडे यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया समजावून सांगितली. या मतदानासाठी पसंतीक्रमानुसार मतदान केले जाते. त्यामुळे मतदान प्रक्रिया समजावून घ्यावी. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे कोठेही उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २० जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात ५८ केंद्रे राहणार आहेत.
शनिवारी या निवडणुकीसंदर्भातील पहिले प्रशिक्षण सत्र पार पडले. द्वितीय प्रशिक्षण १३ जून रोजी तर तिसरे प्रशिक्षण १९ जून रोजी होणार आहे. या तिसऱ्या प्रशिक्षणावेळी मतदान केंद्राध्यक्षांना त्यांच्या मतदान केंद्रांवर आवश्यक साहित्याचेही वितरण केले जाणार आहे.