उस्मानाबाद -: शासकीय बहुउद्देशीय संमिश्र अपंग केंद्र, हौसींग सोसायटी, यादव हॉस्पीटलच्या पाठीमागे, मु.पो.ता.अंबाजोगाई, जिल्हा बीड या संस्थेत सन 2014-15 या चालू शैक्षणिक वर्षासाठी अपंग मुलांना  (अंध,अस्थिव्यंग व मुकबधीर प्रवर्ग)  या संस्थेत प्रवेश देण्यात येणार असून 10 जून पर्यंत अर्ज मिळण्याची ( शासकीय सुटी वगळून)  तर 16 जून,2014 ही प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख असल्याचे अधिक्षक, शासकीय बहुउद्देशीय संमिश्र अपंग केंद्र,अंबाजोगाई यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
    प्रवेशासाठी मुलांचे वय 6 ते 14 वर्ष, मुलगा अंध,अस्थिव्यंग व मुक-बधीर यापैकी कोणत्याही एकाच प्रकारे अपंग असावा. प्रवेशित अपंग विद्यार्थ्यांना रहाणे, भोजन, शैक्षणिक साहित्य आदि सुविधा शासनाकडून विनामुल्य देण्यात येणार आहेत.
    तरी गरजूनी प्रत्यक्ष किंवा पत्राद्वारे संपर्क साधावा, असेही आवाहन अपंग केंद्राच्या अधिक्षकांनी एका पत्रकान्वये केले आहे.   
 
Top