बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : अचानक सुटलेल्या वादळात खामगांव (ता.बार्शी) येथील सोपल यांच्या आर्यन शुगर्स या खाजगी साखर कारखान्याच्या गोदामाचे छप्पर उडाले, यावेळी पाऊस पडल्याने आतील साखर भिजून खराब झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
     या गोदामात ठेवण्यात आलेल्या सुमारे ४५ ते ५० हजार क्विंटल तयार साखर छत उडून झालेल्या पावसाने भिजली आहेत. याचप्रमाणे मुख्य इमारतीवरील पत्रे उडाल्याने सुमारे २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याचे एम.डी. एस.आर.धाबेकर यांनी दिली. यावेळी कारखान्याचे चेअरमन योगेश सोपल, संचालक विलास रेणके व विश्वस्त उपस्थित होते. गुरुवारी दि.२६ रोजी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळात सदरची घटना घडली. यावेळी दोन गोदामाचा वरचा छत उडून गेला. यावेळी साखर कारखान्याच्या मुख्य इमारतीवरील काही पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे.
    बार्शी तालुक्यात सद्यस्थितीत सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा इंद्रेश्वर शुगर्स व पालकमंत्री सोपल यांचा आर्यन शुगर्स हे केवळ दोन खाजगी साखर कारखाने सुरु असून. या दोन्ही साखर कारखान्याचा चांगला फायदा आजपर्यंत शेतकर्‍यांना झाला आहे.
 
Top