उस्मानाबाद :- राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा, कामठा आणि कात्री आदि गावाना भेटी देवून तेथील जनतेच्या अडी-अडचणी समजावून घेतल्या. शासकीय योजनेपासून कोणीही वंचित राहू नये,असे प्रतिपादन  चव्हाण यांनी केले.
       तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे दलित सुधार वस्ती योजना, इंदिरा आवास योजना, पाणीपुरवठा योजना, हांगणदारीमुक्त गाव तसेच पर्यावरण समतोल राखणे आदि बाबत आढावा घेतला. कामठा येथे जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेल्या निधीतून दर्जेदार कामे करावीत, अशा सूचना पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी  दिल्या.
    यावेळी तुळजापूर प्राधिकरणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती पंडित जोकार, अॅड. धीरज पाटील, बाबा वडणे, गटविकास अधिकारी श्री. खिल्लारे, नायब तहसीलदार श्री. वाघे, तालुका कृषी अधिकारी श्री.जाधव, महावितरणचे श्री. म्हेत्रे आदि उपस्थित होते.
     आपसिंगा ते दीपनगर तांडयापर्यंतचा रस्ता पूर्ण करण्यात यावा, असे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. शासनाच्या विविध योजना अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होत असून राजीव गांधी जीवनदायी योजनेत आजारी रुग्णांना या योजनेचा  लाभ झाला आहे. गारपीटमुळे झालेले नुकसान भरपाईसाठी शासनाने  निधी मंजूर केला आहे. निराधार लोकांना शासनाने घरकुल योजनेतून  घरे देऊन आधार दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
      काटी येथील पाणीपुरवठा योजनेतील व विहिरीचे कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित  अधिका-यांना सूचना पालकमंत्री चव्हाण यांनी  दिल्या.   त्या-त्या गावातील   सरपंच, उपसरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top