पांगरी (गणेश गोडसे) :- छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विटंबना प्रकरणामुळे संप्पत झालेल्या तरूणांच्या भावना अजुनही शांत होण्यास तयार नसुन सोमवार दि. 2 जुन रोजी दुस-या दिवशीही पांगरी ता.बार्शी बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन पांगरी पंचक्रोशितील सर्वपक्षिय कार्यकर्त्यासह शिवप्रेमींनी सकाळी दहा वाजता पुणे-लातुर राज्यमार्गावर पांगरी बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणा-या समाजकंटकावर कायदेशीर कठोर कारवाई करण्याचे व पुन्हा अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी घेण्याबाबतचे लेखी निवेदनही यावेळी रास्ता रोको आंदोलकांनी पांगरीचे स.पो.नि. बी.डी.होवाळ व उपनिरीक्षक राजु राठोड यांच्याकडे देण्यात आले. आगळगांव येथेही आज कडकडीत बंद पाळुन विटंबना प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला. महापुरूषांच्या बदनामींमुळे सर्वसामान्य जनतेसह तरूण, व्यापारी, शिवप्रेमी तरूणांसह सर्वपक्षिय कार्यकत्यांच्या भावना तीव्र झालेल्या होत्या. रविवारी पांगरीत दिवसभर किरकोळ घटना वगळता कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवण्यात आला होता. आठवडी बाजारावरही सावट होते. सोमवारी दुस-या दिवशीही व्यापारी, हॉटेल व्यावसायीकांसह सर्वसामान्य नागरीकांनी उस्फुर्तपणे बंद पाळुन रास्ता रोको आंदोलन करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली. पांगरी बस्स्थानकावर झालेल्या रास्ता रोको आंदोलनात पांगरीचे तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख, राजाभाऊ पाटील, धनंजय तौर, प्रतिक गोडसे, शहाजान बागवान, विक्रांत गरड, राहुल गोडसे, समाधान पोफळे, रमेश मुळे, फारूक शेख, कल्यान देशमुख, सुधाकर मोरे, अजित वासकर, जयेश सुतार, रामलिंग गोडसे, शहाजी काळे, राजाभाऊ शिंदे, गणेश गोडसे, उमेश गवळी, प्रशांत गोडसे, यांच्यासह पांढरी चिंचोली, ऊक्कडगांव, झानपुर आदी गावातील नागरीक व शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते. रास्ता रोकोमुळे राज्यमार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दादा लोंढे, जनार्धन सिरसट अदींनी चोख बंदोबस्त ठेवला.