दिल्ली :- भाजपचे नेते, केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे रुग्णालयात सकाळी 8 वाजता निधन झाले.
सकाळी 6.45 वाजता इंडिगो कारने गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला जोरदार टक्कर दिली. मुंडे कारमध्ये मागील सीटवर बसले होते. त्यांच्यासोबत त्यांचे पीए नायर बसले होते. मुंडे हे मुंबईला येत होते. त्यासाठी ते दिल्ली विमानतळावर आपल्या कारने जात होते. त्याचवेळी अरविंदो मार्गावर इंडिगो कराने धडक दिली. या अपघातात मुंडे गंभीर जखमी झालेत. त्यांना तात्काळ एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहेत.
अपघातानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार तात्काळ करण्यात आलेत. मात्र, सकाळी 8 वाजताच्या दरम्यान, त्यांचे निधन झाले. निधनाचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी परळीतील मुंडे यांच्या घरी गर्दी केलेय.
केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी आल्यानंतर मुंडे यांनी आपल्या खात्याचे काम सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीत ठाण मांडून होते. औरंगाबाद येथे आज होणा-या कार्यक्रमासाठी ते महाराष्ट्राकडे निघाले होते. सकाळी साडेसहाच्या सुमारास आपल्या लोधी रोडवरील निवासस्थानावरून ते दिल्ली विमानतळाकडे निघाले असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. गाडीचा चालकही गंभीर जखमी झाला.