बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन घोषणा देण्यात आला. यानंतर समाजकंटकांचा निषेध करुन पोलिसांना निवेदन देण्यात आले.
    फेसबुकसारख्या सोशल मिडीयावरुन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदी महापुरुषांची बदनामी तसेच हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न समाजकंटकांनी केला. सदरच्या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निज्ञाला. या घटनेने सर्वसामान्यांना नाहक त्रास होऊन प्रशासनावरदेखिल त्राण वाढला आहे. बार्शीतील मुस्लिम समाजाच्या वतीने सदरच्या कृत्याचा निषेध करण्यात आला व अशा प्रकारच्या अत्यंत निंदनीय कृत्य करणार्‍या आरोपींचा शोध घेऊन कठोर शासन करावे असे निवेदन अतिरिक्त पोलिस अधिक्षक लक्ष्मीकांत पाटील यांना बार्शी पोलिस ठाण्यात देण्यात आले.
    यावेळी उपविभागीय पोलिस अधिक्षक रोहिदास पाटील, पोलिस निरीक्षक सालार चाऊस, नगराध्यक्ष कादर तांबोळी, ऍड्.असिफ तांबोळी, नगरसेवक शमशोद्दीन केमकर, माजी नगरसेवक वाहिद शेख, रफिक तांबोळी, मंजूर शेख, इमामभाई तांबोळी, ऍड्.राजू शेख, कय्युमभाई पटेल, इकबाल पटेल, मोहसिन सौदागर, आर.पी.पठाण, वसीम शेख, बिलाल तांबोळी, सफराज तांबोळी, अस्लम येडशीकर, मजहर तांबोळी, जाकीर चौधरी, म.हनिफ चौधरी, वाजीद आजार, मुन्ना बागवान, जमील सौदागर, ऍड्.मुजाहिद तांबेाळी यासह मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top