पांगरी (गणेश गोडसे) :- महाविद्यालयीन तरूणीस लग्नाचे आमिष दाखवुन तिच्या परस्पर दुस-या मुलीबरोबर विवाह करून फसवणुक करत तिला मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची घटना चिंचोली ता.बार्शी येथे काल दि.6 शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.
रोहिनी सुनिल शिंदे (वय 24, रा.चिंचोली, ता.बार्शी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या उच्चशिक्षित तरूणीचे नांव असुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरूध्द पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करन्यात आला आहे. संतोष सुरेश माकोडे (वय 26) सिमा सुरेश माकोडे (वय 45, दोघेही रा.पांगरी), शेषराव किरण करळे (वय 32, रा.नालगांव, ता.परंडा) व पांडुरंग शिवाजी पवार (वय 33, रा.चिंचोली) अशी तरूणीस आत्महत्या करण्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.
सुनिल वसुदेव शिंदे (रा.चिंचोली) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपी संतोष माकोडे यांनी मयत रोहिणी हिस लग्नाचे आमिष दाखवुन प्रेमसंबंध प्रस्थापित केले. सिमा माकोडे व शेषराव करळे या दोघांनी रोहीणी हिस तुझे लग्न संतोष बरोबर लावुन देतो असे वचन दिले होते व आरोपी पांडुरंग पवार याने हे प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यासाठी मदत केली. मात्र रोहिणी हिच्याबरोबर लग्न न करता आरोपींनी संगनमत करुन संतोष याचे लग्न दुस-या मुलीसोबत नुकतेच लावुन दिले होते. लग्नाची माहिती मृत रोहिणी हिला समजताच आपली फसवणुक झाल्याची खात्री झाल्यानंतर व मानसिक त्रास सहन न झाल्याने रोहिने हिने चिंचोली गावातील त्यांच्याच जुन्या पडक्या वाडयात गळफास लावुन घेऊन आत्महत्या केली. रोहिनी ही सध्या सोलापुरात एम.एस.सी चे शिक्षण घेत होती. सुनिल शिंदे यांच्या फिर्यादिवरून पांगरी पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व प्रेमप्रकरणास मदत केल्याप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल झाला असुन चौघांनाही अटक करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजु राठोड हे करत आहेत.