उस्मानाबाद :- भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय ग्रामंत्री कै.गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपचे सरकार आल्यानंतर सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग १०० टक्के पुर्ण करू, असे जाहीर केले होते. मुंडे यांच्या तुळजापूर रेल्वेचे स्वप्नपुर्ती व्हावी यासाठी आता प्रसार माध्यमानी जोर लावण्याची आवश्यकता असल्याची मत पत्रकार देविदास पाठक यांनी उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
    उस्मानाबाद शहरातील पत्रकार भवनात उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री कै.गोपीनाथ मुंडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव,सरचिटणीस राजाभाऊ वैद्य,उपाध्यक्ष श्रीकांत कदमउपस्थित होते.यावेळी पाठक यांनी कै.मुंडे यांच्या कांही जुन्या आठवणींना उजाळा देऊन इतक्या लवकर मुंडे साहेब जातील असे वाटले नव्हते असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी पत्रकार संतोष शेटे, जे.बी.राजपूत, शिला उंबरे पेंढारकर, सचिन व्हनसनाळे, इम्रान खान, सुभाष कदम, सय्यद, मच्छिंद्र कदम,अजिंक्य माने आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजाभाऊ वैद्य यांनी केले.
 
Top