बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: तेरखेडा (ता.वाशी, जि.धाराशिव) येथील वेलकम फायर वर्क्स आणि प्रिन्स फायर वर्क्स या शोभेची व आवाजाची दारु (फटाके) उत्पादन कारखान्यांमध्ये झालेल्या स्फोटात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी चार वाजता व साडेचार वाजता आकाशातून कोसळलेल्या विजेमुळे हा स्फोट झाल्याचे मृताच्या नातेवाईकांचे मत आहे.
        अमिना मुजावर, शबाना पठाण, रबाना पठाण, ताहिरा मुलाणी, लतिफा मुलाणी या महिला तसेच चार वर्षांची ताहिरा पठाण असे वेलकम फायर वर्क्स या कारखान्यातील स्फोटात तर अजय नंदू फरताडे, मिलींद मस्के असे प्रिन्स फायर वर्क्स या कारखान्यातील स्फोटामुळे जागीच मयत झालेल्यांची नावे आहेत. या कालावधीत पाऊस सुरु असल्याने तसेच ठिकाणाजवळ असलेल्या तेरणा नदीला पूर आला आहे, कारखान्याच्या परिसरात काळ्या मातीचा परिसर असल्याने चिखल झाला आहे. तसेच ढिगार्‍याखाली अडकलेल्या मृतांचा तपास करण्यास पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची माहिती येरमाळा पोलिसांकडून मिळाली.
 
Top