पांगरी (गणेश गोडसे) : बार्शी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या पांगरी विभागाचे वनरक्षक धनंजय शिदोडकर यांनी वनीकरणासह जल व मृदु संधारण वनरक्षण रोजगार हमीतुन वृक्षारोपन, संगोपन यासह वृक्षतोडीवर उंकुश आदी भरिव काम केल्याचे प्रतिपादन आर.बी.धुमाळ यांनी केले.
    उल्लेखनिय कामगिरी केल्याबदल सहकारी व पांगरी ग्रामस्थांतर्फे शिदोडकर त्यांचा यथोचित सत्कार करण्‍यात आला. यावेळी बार्शीचे वनक्षेत्रपाल आर.बी.धुमाळ, पांगरीचे वनपाल ए.जे.तोगे, वैरागचे वनपाल टी.एस.जाधवर, एस.एल.पाटील, पानगावचे वनरक्षक एस.ए.घावटे, वनरक्षक एस.र.बडे, ए.आर.पिरजादे, आर.एस.शेळके, रशीद पठाण, सुरेश गोंदिल, सुधाकर जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top