पांगरी (गणेश गोडसे) :- स्वस्त धान्य दुकानात वाटपासाठी आलेला माल आणण्यासाठी गेलेल्या एका 35 वर्षिय महिलेला रेशन दुकानदाराने शिविगाळ दमदाटी करत लाथाबुक्यांनी मारहान करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना पिंपळवाडी (ता.बार्शी) येथील स्वस्त धान्य दुकानसमोर घडली.
सौ.शारदा रामदास चौधरी (वय ३५, रा.पिंपळवाडी) असे लाथाबुक्यानी झालेल्या मारहाणीतील जखमी महिलेचे नांव असुन बाळासाहेब शंकर चौधरी असे मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या स्वस्त धान्य दुकानचालकाचे नांव आहे.
सौ.शारदा रामदास चौधरी या महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, स्वस्त धान्य दुकानास वितरणासाठी आलेला माल वाटपाचे काम सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या गावातीलच बाळासाहेब चौधरी हे चालक असलेल्या रेशन दुकानात गेल्या असता त्यांना शिविगाळ करून लाथाबुक्यांनी मारहान करत मी माल देणार नाही असे म्हणत जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादित म्हटले आहे. महिलेल्या तक्रारीवरून रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.