परंडा :- समर्थ रामदास स्वामी यांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी यांच्या डोमगाव (ता. परंडा) येथील मठात कल्याणस्वामी यांच्या तैलचित्राचे अनावरण रामदास स्वामी यांचे ११ वे वंशज भुषणस्वामी यांच्या हस्ते आज शुक्रवार दि. ४ जुलै रोजी करण्यात आले.पुणे येथील नामवंत चित्रकार गोपाळ नांदुरकर यांनी हे तैलचित्र काढले आहे. कल्याण स्वामी यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त डोमगांव व परंडा येथील मठामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या त्रिशब्दी महोत्सवाचे औचित्य साधून चित्रकार नांदुरकर यांनी सिध्दासन आसनात तयार केलेले तैलचित्र डोमगांव येथील मठाला अर्पण करण्यात आले आहे. या तैलचित्राचे अनावरण समर्थ रामदास स्वामी यांचे ११ वे वंशज भुषण स्वामी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मंदारबुवा रामदासी, शहाजीबुवा रामदासी, डोमगांव देवस्थानचे विश्वस्त संजय जहागिरदार, परंडा येथील कल्याणस्वामी ट्रस्टचे अध्यक्ष तथा नगरसेवक मुवूâल देशमुख, मुधकर मिस्कीन इ. उपस्थित होते.
उपलब्ध माहितीनुसार कल्याणस्वामीची देहबोली, चेह-यावरील भाव, भक्ती, सिध्दासनातील बैठक इत्यादी बाबाची विचार या तैलचित्रात करण्यात आल्याचे दिसून येते, आता पर्यंत उपलब्ध असलेल्या चित्रापैकी हे सर्वोत्कृष्ट चित्र असल्याचे भुषणस्वामी यावेळी म्हणाले.