उस्मानाबाद :- जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबादच्या वतीने जिल्ह्यातील सुशिक्षित  बेरोजगार, नोकरी व स्वयंरोजगार इच्छुक बेरोजगार तसेच उद्योजकांसाठी 31 जुलैपर्यंत उमेदवार नोंदणी जागृती अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपल्या नावाची  नोंदणी करुन या ऑनलाइन सुविधेचा  लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राचे साहायक संचालक रमेश पवार यांनी केले आहे.
    रोजगार व स्वयंरोजगार विभागाने  http://www.maharojgar.gov.in हे वेबपोर्टल विकसीत केले असून  उमेदवार, उद्योजक तथा शासकीय संस्था/ प्रशिक्षण संस्थांना विविध याना विविध सुविधा ऑनलाईन विनामुल्य पुरविण्यात येतात. यात सुशिक्षीत बेरोजगार, नोकरी इच्छुक, स्वयंरोजगार  इच्छुक तसेच नोकरी करणारे अनुभवी उमेदवार जॉब सीकर यांनी स्वत:च्या नावांची नोंदणी करुन शैक्षणिक पात्रता वाढ, रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवून  रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम प्रशिक्षणासाठी संमती नोंदविणे. स्वयंरोजगार विषयक योजनांची माहिती आदि ऑनलाईन सुविधा व उद्योजक यांनी त्यांच्या संस्थेची नेांदणी करणे,
तसेच तिमाही विवरणपत्र ईआर-1 भरणे, उद्योजकांनी त्यांच्याकडील पदे अधिसूचित करणे, सदर अधिसूचनेस अनुसरुन पात्र उमेदवारांची यादी प्राप्त करुन घेणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षणासाठी जागा अधिसूचित करुन पात्र उमेदवारांची यादी प्राप्त करुन घेणे आदि ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
      याशिवाय शहरी व ग्रामीण भागातील सर्व बेरोजगार उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वरील संकेतस्थळावरुन पुरविण्यात येणाऱ्या वरील सर्व सेवा सुविधा जिल्ह्यातील 8 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तंत्र निकेतन, उस्मानाबाद व या जिल्हयात कार्यरत एकुण 182 महा- ई-सेवा केंद्रे त्यापैकी उस्मानाबाद- 46, तुळजापूर-25, उमरगा- 16, लोहारा-9, कळंब-26, वाशी-19, भूम- 18 व परंडा- 23 या आठ तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्रावर उपलब्ध करुन  देण्यात आलेल्या आहेत.
      शालांत प्रमाणपत्र परीक्षा, एच. एस. सी, पदवी परीक्षा, विविध पदविका, आयटीआय आदिचे निकाल जाहीर झाल्याने  सर्व विद्यार्थी /उमेदवार व त्यांच्या पालकांनी संबंधित शैक्षणीक संस्था, शाळा, महाविद्यालयांनी या कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना-सुविधांची माहिती घेवून उमेदवार नोंदणी जागृती अभियान योजनाचा लाभ घ्यावा, असेही कळविण्यात आले आहे.
 
Top