उस्मानाबाद :- जिल्ह्यात अद्यापही पावसाने दडी मारल्याने शेतातील पेरण्या खोळंबल्या आहेत तसेच काही भगात पाणीटंचाईची जाणवू लागली आहे. पाऊस लांबला तर पाणीटंचाईची समस्या तीव्र होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नुकतीच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांची बैठक घेऊन पाणीटंचाई उपाययोजनांसंदर्भात तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यात सध्या 1 जूनपासून पडलेल्या पावसाची टक्केवारी केवळ 4.7 टक्के एवढी आहे. प्रत्येक तालुक्यात केवळ पावसाने हजेरी लावून पुन्हा ओढ दिली आहे. त्याचा मोठा फटका कृषीविषयक कामांवर झाला आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 767.5 मिलीमीटर एवढी आहे. जून महिन्याची ही सरासरी 165.3 मि.मी. इतकी आहे. मागील वर्षी जून, 2013 मध्ये 108 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी जून महिन्यात केवळ सरासरी 36.4 मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे या परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी संबंधितांना त्यांच्या कार्यक्षेत्रात आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, पाणीपुरवठा, सिंचन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण, लघुपाटबंधारे विभाग, पशुसंवर्धन विभाग या सामान्य नागरिकांशी संबंधीत विभागांकडूनही यासंदर्भातील टंचाई उपाययोजना संदर्भातील कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात 1 मोठा प्रकल्प, 17 मध्यम प्रकल्प आणि 193 लघु प्रकल्प असे एकूण 211 प्रकल्प आहेत. सध्या विविध प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा केवळ 26 दशलक्ष घनमीटर एवढाच आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची ही टक्केवारी केवळ 4 टक्के एवढी आहे. त्यामुळे या पाण्याचा अवैध उपसा रोखण्याचे स्पष्ट निर्देश डॉ. नारनवरे यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत.
ग्रामीण व नागरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी विहीर अधीग्रहण व टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या ग्रामीण भागात 69 गावे आणि 11 वाड्यांना 14 शासकीय व 55 खाजगी अशा 69 टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहेत. याशिवाय 313 विहीरी/विंधनविहीरी अधीग्रहित करुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या नळ योजनांची विशेष दुरुस्ती, खासगी विहीरींचे अधीग्रहण, टॅंकर व बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे अशा उपाययोजनाही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
याशिवाय, चारा नियोजन, कृषी निविष्ठांची मागणी व उपलब्धता, आपत्कालिन कृषी व्यवस्थापन आराखडा, जिल्ह्यातील पशुधनांची संख्या व चारा उपलब्धता याबाबतचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्याच्या सूचना डॉ. नारनवरे यांनी दिल्या आहेत.