उस्मानाबाद :- संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळातर्फे चर्मकार समाजातील मुलांमुलींसाठी प्रशिक्षण योजना व्यावसायीक कौशल्य वाढविण्याच्या हेतूने  राबविण्यात येत आहे.  प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी आपले  प्रस्ताव 15 जुलैपर्यंत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, उस्मानाबाद कार्यालयात पाठवावेत,  असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ,मुंबईचे व्वस्थापकीय संचालक स. ज. भोसले यांनी केले आहे.
        संबंधित संस्था व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, व्यवसायाचे शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा मंडळ यांच्या कडून  मान्यता प्राप्त अथवा इतर तत्सम संस्थेशी  संलग्न असावी. संस्था मागील सलग पाच वर्षापासून कार्यरत असावी, संस्थेचे मागील तीन वर्षाचे ऑडीट पूर्ण झालेले असावे. संस्थेकडे ट्रेडनिहाय प्रशिक्षणासाठी प्रशस्त जागा, यंत्रसामुग्री व प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असावा. संस्थेकडून मागील तीन वर्षात ट्रेडनिहाय किती प्रशिक्षणार्थींना वर्षनिहाय प्रशिक्षण दिले त्‍याचा तपशिल दयावा. मागील तीन वर्षात किती प्रशिक्षणार्थ्यांनी  स्वताचा व्यवसाय सुरु केला आहे, त्यांना नोकरी मिळाली आहे काय याचा तपशिलही देण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
        सदर संस्थेस शासन मान्यतेप्रमाणे एका वर्षात ट्रेडनिहाय किती विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी मान्यता असल्याचा सविस्तर तपशिल द्यावा. प्रशिक्षण पूर्ण  केल्यानंतर सदर ट्रेडची परीक्षा कोणामार्फत घेतली जाईल याचा तपशिल दयावा. प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर जॉब प्लेसमेंटकरीता आपणाकडून काय कार्यवाही केली व स्वयंरोजगार थाटण्यासाठी कोणती मदत प्रशिक्षणार्थ्यास करण्यात येते याकरीता आपणाकडे कोणती  यंत्रणा कार्यरत आहे याचा तपशिल दयावा.
       तसेच बाहेरगावच्या  प्रशिक्षणार्थ्यांसाठी  राहण्याची व भोजनाची व्यवस्था होवू शकेल काय याबाबत तपशिलाची माहिती द्यावी. उपरोक्त अटींची पूर्तता करणा-या संस्थांनी त्यांचे प्रस्ताव १५ जुलैपर्यंत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, उस्मानाबाद येथे पाठवावेत  असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी  संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मर्यादित बाँम्बे लाईफ इमारत 5 वा मजला 45 वीर नरीमन रोड मुंबई-400001 दूरध्वनी क्र. 022-22044186, 22047157 येथे संपर्क साधावा अथवा जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोदयोग व चर्मकार विकास महामंडळ कार्यालयाशी संपर्क साधावा. 
 
Top