उस्मानाबाद :- बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प ता. तुळजापूर, (जि. उस्मानाबाद) कार्यालयात 3 मदतनीसाची पदे भरण्यात येणार असून इच्छुक स्थानिक महिलांनी विहीत नमुन्यात अर्ज 21 जुलैपर्यंत पाठवावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, तुळजापूर यांनी केले आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर अंगणवाडी क्रंमाक 146 , धनगरवाडी अंगणवाडी क्र. 163 आणि मंगरुळ-अपसिंगा अंगणवाडी क्रमांक 137 असे प्रत्येकी एक प्रमाणे एकुण 3 मदतणीसाची पदे रिक्त् असून ती पदे भरण्यात येणार आहे. मदतनीस पदासाठी किमान 7 वी उत्तीर्ण असावे, वयोमर्यादा 21 ते 35 वर्षे अशी आहे. अर्जदार महिला लहान कुटुंब व्याख्येत बसणारी असावे, गुणानुक्रमे सर्वाधिक गुण असणा-या पहिल्या तीन महिलांनाच मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
अर्जाचा विहीत नमुना एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, ता. तुळजापूर येथे रुपये 50 शुल्क भरल्यानंतर मिळेल. अर्जासोबत स्थानिक रहिवासीबाबत ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र किंवा स्वताचे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, मागासवर्गीय असल्यास तहसीलदार/ उपविभागीय अधिकारी यांचे प्रमाणपत्रे, विधवांच्या बाबतीत गटविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र व शासन /अनुदानीत संस्थेतील विधवा व अनाथ मुलांच्या बाबतीत जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हतेबाबत 10 वी 12 वीनंतर डी.एड, मार्क मेमो, टी. सी. आदि साक्षांकित प्रमाणपत्रे सेाबत सोडावीत, 7 वी पास महिलांनी गुणपत्रक, टी. सी. गट शिक्षणाधिकारी यांनी साक्षांकन केलेले प्रमाणपत्र सेाबत जोडणे आवश्यक आहे.
वरील अटीत बसणा-या त्या त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील पात्र महिलांनी विहीत नमुन्यातील अर्जात स्वत:च्या हस्ताक्षरात माहिती भरुन अर्ज सादर करावीत. खोटी कागदपत्रे सादर करु नये, तसे आढळून आल्यास निवड प्रक्रियेसासाठी अपात्र ठरवून कार्यवाही करण्यात येईल. अंगणवाडी मानधनी पदासाठी बदल व भरती प्रक्रियेचे अधिकार वेळोवेळी प्राप्त होणा-या शासन निर्णयाच्या आधिन राहून अंमलबजावणी करण्याचे अधिकार या कार्यालयाने राखून ठेवले आहेत, असे कळविण्यात आले आहे.