सोलापूर -: रमाई आवास घरकुल योजनेमुळे अनुसूचित जाती, नवबौध्द घटकांतील सर्वसामान्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. असे प्रतीपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी केले.
बार्शी नगरपालिके अंतर्गत रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप व वारसा अनुकंपा धारकांना नियुक्ती पत्र वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बार्शीचे नगराध्यक्ष कादर तांबोळी, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त श्रीमती मनिषा फुले, नगर विकास विभागचे प्रशासन अधिकारी त्रिंबक ढेगळे-पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना पालकमंत्री सोपल म्हणाले की, प्रत्येकाचे घरकुलाचे स्वप्न असते. अनुसूचित जाती, नवबौध्द घटकातील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांचे हे घरकुलाचे स्वप्न आघाडी शासनाच्या प्रयत्नामुळे पूर्ण झाले आहे. बार्शी शहरात पहिल्या टप्प्यात 430 व दुस-या टप्प्यात 400 घरकुले या योजने अंतर्गत सुरु झाली. या योजनेच्या लाभार्थ्यांनी योजनेतुन मिळणा-या रकमेपेक्षा स्वत:चे जास्तीचे पैसे घालुन अतिशय चांगले पध्दतीचे घरे झाली याबद्दल विशेष समाधान वाटते असे प्रतिपादन केले.
वंचित लाभार्थ्यांनी या योजनेची आवश्यक असणारी कागदपत्रांची पूर्तता करुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सोपल यांनी केले.
या प्रसंगी नगरसेवक श्री. नागेश अंकलकोटे यांनी या घरकुल योजनेच्या पहिल्या व दुस-या टप्प्याबाबतच्या अंमलबजावणीबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच या घरकुल योजनेतील शौचालय तसेच शौचालयाची व नळाची योजना बार्शी शहरात राबविण्यात आली. या शौचालयाचा नागरिकांनी वापर केला पाहिजे व आपल्या भागातील आरोग्य चांगले राहिले पाहिजे यासाठी विशेष द्यावे असे मत व्यक्त केले.
या वेळी पालकमंत्री श्री. सोपल यांच्या हस्ते या योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश व वारसा अनुकंपा धारकांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी घरकुल समितीचे पदाधिकारी नवनाथ चांदणे यांचेही समयोचित भाषण झाले.