बारुळ (सुधीर सुपनार) : तुळजापूर तालुक्‍यातील बारुळ येथील जि.प. शाळेच्‍या भोवती प्रचंड घाणीचे साम्राज्‍य पसरले आहे. त्‍यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्‍यांची हेळसांड होत आहे. तसेच शाळेची इमारत मोडकळीसच्‍या अवस्‍थेत आहे. त्‍यामुळे विद्यार्थ्‍यांचे आरोग्‍य व भविष्‍य धोक्‍यात येत आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्‍याचे दिसते. यामुळे बारुळ ग्रामस्‍थांमधून तीव्र नाराजी व्‍यक्‍त होत आहे. दरम्‍यान, शाळेच्‍या इमारत बांधकामाची मंजुरी मिळाली असून मात्र अद्यापर्यंत काम चालू झाले नाही.
 
Top