बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: तालुक्यातील बृहत, मध्यम व लघु प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठा पिण्याच्या पाण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार राखून ठेवण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री मस्के यांनी दिली.
याबाबत बार्शीतील पाटबंधारे विभागास जिल्हाधिकारी यांनी लेखी पत्र दिले आहेत. पुणे विभागीय कार्यालयातून घेण्यात आलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये झालेल्या सविस्तर चर्चेनंतर सोलापूर जिल्ह्यासह इतरही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी सदरची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत भारतीय हवामान वेधशाळेने सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाचे अंदाज वर्तवले होते. त्यानुसार राज्यभरातील उपलब्ध पाणीसाठ्याचे निरीक्षण करण्यात आले आहे.
बार्शी तालुक्यात हिंगणी पा., जवळगाव, पिंपळगाव असे मध्यम प्रकल्प आहेत. याशिवाय पाथरी, कोरेगाव, चारे, वालवड, काटेगाव, कळंबवाडी, ममदापूर, गोरमाळे, कारी, तावडी, वैराग, शेळगाव (आर), घाणेगाव, इर्ले, तडवळे, देगाव, डिकसळ, भोयरे आदी लघु प्रकल्प आहेत. मागच्या वर्षी झालेल्या पावसाच्या नोंदीप्रमाणे जवळगाव व कोरेगाव वगळता सर्व मध्यम व लघु प्रकल्प शंभर टक्के पाण्याने भरली होती.
सद्यस्थितीत मध्यम प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठा हिंगणी पा. ४९६.४० दशलक्ष घनमीटर (१२.०५ टक्के), जवळगाव ४९६.८३ द.ल.घ.मी. (७.२५ टक्के), पिंपळगाव ४९७.५३ द.ल.घ.मी. (२०.७२ टक्के.) उपलब्ध आहे. तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पामध्ये एकूण ९.०९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहेत. तर दि.१ जून पासूनचे पर्जन्यमान हिंगणी ३५ मि.मी.तर जवळगाव २३ मि.मी. पावसाची नोंद पाटबंधारे विभागाने नोदविली आहे.