पांगरी (गणेश गोडसे) :- स्वातंत्र्याच्‍या ६५ वर्षानंतरही आज ग्रामस्थांना गावात ये-जा करण्‍यासाठी रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी रास्ता राको सारखे आंदोलन करावे लागत आहे. लाजिरवाणी बाब असुन ग्रामस्थांसह शेतक-यांच्या सहनशिलतेचा अंत न पहाता घोळवेवाडी ग्रामस्थांना वाहतुकीसाठी घोळवेवाडी-कारी रस्ता उपलब्ध करूण द्यावा या मागणीसाठी शुक्रवार दि. ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता घोळवेवाडी (ता.बार्शी) ग्रामस्थांनी महिला व वृध्‍दांसह पुणे-लातुर राज्यमार्गावर ढेंबरेवाडी गावात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी घोळवेवाडीचे सरपंच माणिक तोगे, अजय दराडे यांनी पांगरीचे मंडळ अधिकारी बेले व पांगरी पोलिस ठाण्याचे स.पो.नि.बाळासाहेब होवाळ यांच्याकडे मागण्‍याचे निवेदन दिले.
    घोळवेवाडी गावाला रस्ता नसल्यामुळे गावाचा विकास खुंटुन ग्रामस्थांसह शेतकरी, शेतमजुरी, कामगार, वाहनचालक, विद्यार्थी यांच्यासह आजारी वृदध यांना अनंत अडचनींचा सामना करावा लागत असल्यामुळे रस्त्याचा प्रश्‍न सोडवण्‍यासंदर्भात जिल्हाधिका-यांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्‍यात आली होती. मात्र तालुकास्तरासह जिल्हास्तरावरही या मागणीची दखल न घेतल्यामुळे रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त करण्‍यात आला. रस्त्याच्या प्रश्‍नाकडे लक्ष न दिल्यास रास्ता-रोको करण्‍याचा इशाराही देण्‍यात आला होता.
   रास्ता राको आंदोलनावेळी घोळवेवाडीचे सरपंच माणिक तोगे, उपसरपंच बळीराम डोळे घोळवे, अजय दराडे, माजी सरपंच हनुमंत घोळवे, युवा सेना जिल्हा उपप्रमुख किरण गायकवाड, डॉ.विलास लाडे, दत्तात्रय घोळवे, दिलिप घोळवे, ऐजिनाथ घोळवे, भारत घोळवे, विकास घोळवे, सतिश घोळवे, वसंत घोळवे, रमेश घोळवे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
    पुणे-लातुर राज्यमार्गावर ढेंबरेवाडी गावाच्या बसस्थानकासमोरच रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे राज्यमार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बराच काळ राज्यमार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.
 
Top