उस्मानाबाद -: प्रत्येक महिला अधिका-यांनी आपल्या विचाराची  आदान प्रदानाच्या कार्याची क्षमता वाढविण्यासाठी महिला अधिकारी यांचे गट निर्माण करुन आपल्या प्रत्येक मुद्याबाबत महिला सक्षमीकरणासाठी गटकृती आराखडे तयार करा, असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. 
   स्पर्श ग्रामीण रुग्णालय, सास्तूर येथे जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग व स्पर्श ग्रामणी रुग्णालय, सास्तूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला अधिकारी वर्ग-1 व वर्ग-2 यांच्या एकदिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी बोलतांना केले.
         यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते , उपजिल्हाधिकारी (सामान्य) शिल्पा करमरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) टी.के.नवले, स्पर्श ग्रामीण रुग्णालय, सास्तूरचे प्रकल्प संचालक आर.बी.जोशी आदि आदि उपस्थित होते.
    डॉ.नारनवरे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, महिलांची सुरक्षितता, कायद्याबाबतचे सल्ला व मार्गदर्शन आणि महिला सक्षमीकरणाचा अंतर्भाव असावा या तीन गोष्टीवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याची सूचना करुन पुढे म्हणाले की, महिलांना निर्भिडपणे वावरता येण्यासाठी तसे वातावरण निर्मिती करुन त्यांचे आरोग्य कार्ड तयार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सक्षम महिलांनी बचत गटांनी एकत्र येऊन गटामार्फत महिलांना मार्गदर्शन करुन त्यांना सक्षम करावे. महिला सदृढ असतील तरच समाज सदृढ निर्माण होईल, बचत गटाने जर मनात आणले तर महिला गगनभरारी घेऊ शकतील, यासाठी  स्वंयसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता  त्यांनी व्यकत केली. 
    महिलांनी आपल्यातील महिलेला ओळखल्यास तिच्याशी मैत्री  केल्यास महिला सबलीकरणाचे कार्य होईल आणि महिलांवरील अत्याचाराला पायबंद बसेल, असे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( बा.क.) श्री. नवले यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.
या कार्यशाळेला डायटच्या प्राचार्या डॉ. कमलादेवी आवटे, विधी सहाय सरकारी अभियोक्ता अॅड.  विद्या साखरे, विधी अधिकारी श्रीमती सोनाली पाटील, ऐ.डी.एस.ओ. मनिषा मेने, तहसीलदार राजश्री मोरे, गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे,श्रीमती आर.व्ही. कुंभार, श्रीमती सुधा सांळुके,सौ.एस.एस.भोसले, परिविक्षा अधिकारी सौ. एम.एम.पाटील  व इतर महिला अधिकारी उपस्थित होत्या.
           या एक दिवशीय कार्यशाळेत महिला सक्षमीकरण कृती आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी करणे, महिला अधिकारी यांच्याशी येणाऱ्या अडीअडचणी संबंधी चर्चा करणे, महिलांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे, महिलांसाठी ग्रामविकासाची साधणे तसेच महिलासाठी कायदे विषयक मार्गदर्शन तसेच सर्व विभागांनी महिला सक्षमीकरणासाठी एकत्रित काम करणे व त्याद्वारे चळवळ उभी करणे, ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणात विशेष लक्ष देणे आदि विषयावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. या कार्यशाळेत विविध विभागातील वर्ग-1 व वर्ग-2 च्या सुमारे 40 महिला अधिका-यांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचे प्रास्ताविक आर.बी. जोशी यांनी तर डॉ.रुपाली सातपूते यांनी सर्वांचे आभार मानले.
 
Top