उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य शैक्षणिकसंशोधन वप्रशिक्षण परिषद, पुणेमार्फत 2014-15 या वर्षासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
    संशोधनात्मक कार्याची आवड असणाऱ्या शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा व आपले नवोपक्रम चार प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे 30 नोंव्हेबरपर्यत पाठवावेत. अधिक माहितीसाठी व स्पर्धेचे नियम,अटीसाठी मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व (प्राथमिक) मा. प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व  प्रशिक्षण परिषद, पुणे- 30 या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन  व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.    
 
Top