उस्मानाबाद :- तहसिल कार्यालय, लोहारा येथे जिल्‍हाधिकारी प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली फिरते लोकशाही दिनाचे आयोजन (दि.5जुलै रोजी) करण्यात आले होते.  या फिरत्या लोकशाही दिनामध्ये १९ तक्रारी प्राप्‍त  झाल्‍या असून त्यास जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. जिल्‍हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी सर्व नागरिकांच्या म्हणणे ऐकून घेऊन प्राप्त  तक्रारीबाबत ज्या ज्या विभागाच्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या-त्या विभागाने तातडीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश यावेळी संबंधित यंत्रणेला डॉ. नारनवरे यांनी दिले.
यावेळी  अपर जिल्‍हाधिकारी जे.टी.पाटील, उपविभागीय अधिकारी रविंद्र गुरव, लोहारा प्रभारी तहसिलदार मुस्‍तफा खोंदे, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनीचे अभियंता, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक लोहारा, दूरसंचार विभाग, दुय्यम निबंधक, ग्रामीण पाणी पुरवठा आदि विभागाचे कार्यालय प्रमुखांची  उपस्थिती होती. लोकशाही दिनाच्‍या कार्यक्रमानंतर जिल्‍हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना व पाणी टंचाईबाबत आढावा बैठक घेऊन संबधित यंत्रणेला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी दिल्या.
 
Top