उस्मानाबाद :- शहरात असणा-या फेरीवाले, पथारीवाले व विविध प्रकारच्या विक्रेत्यांसाठी हॉकर्स झोन निर्माण करण्याबाबत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व नगरपालिका मुख्याधिका-यांना दिले आहेत. रहदारीला अडथळा येणार नाही आणि कायमस्वरुपी अतिक्रमण होणार नाही, यादृष्टीने शहरातील मोकळ्या जागांची माहिती घेऊन कोणत्या ठिकाणी हॉकर्स झोन निर्माण करणे सोईचे आहे, याची चाचपणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तुळजापूर येथे बांगडी विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी तुळजापुरात स्वतंत्र व्यवस्था करुन लवकरच सुवासिनी बाजार ही संकल्पना विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात डॉ. नारनवरे यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी फेरीवाले, पथारीवाले यांच्या केंद्रीय संघटनेचे प्रतिनिधीही उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिरासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा नागरी प्रकल्प यंत्रणा संचालक श्री. कुरवलकर यांची यावेळी उपस्थिती होती.
डॉ. नारनवरे म्हणाले की, प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात हॉकर्स झोन असणे आवश्यक आहे. तेथे योग्य किंमतीत ग्राहकांना वस्तू, भाजीपाला, फळे खरेदी करणे सोपे जाईल. प्रत्येक नगरपालिकांनी याबाबतच्या नियमांची आणि निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन संबंधितांकडून होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नगरपालिकांनी या फेरीवाले, पथारीवाले यांचे विक्री सामान ठेवण्यासाठी गोडावून निर्माण करावेत, तसेच 2 गाळे राखीव ठेवावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रत्येक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मोकळी जागा ठेवण्याचे प्रयोजन आहे. ज्या सोसायट्यांनी असा मोकळ्या जागा ठेवल्या नाहीत, त्याची माहिती संकलित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बाजार गाळे आणि हॉकर्स झोन यांची सुरक्षा, स्वच्छता आदींच्या कार्यवाहीसाठी काय उपाययोजना करता येतील, त्याचा आरखडा तयार करुन त्याप्रमाणे अंमलबजावणी सुरु करण्याच्या सुचना डॉ. नारनवरे यांनी दिल्या. याशिवाय, शहरांसाठी स्वतंत्र ऑटो स्टॅन्ड, नो पार्किंग झोन, पार्किंग झोन निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.