बारुळ (सुधीर सुपनार) :- बारुळ (ता. तुळजापूर) या गावात सध्या बालकांच्या शिक्षणाचा श्री गणेशा करणारे विद्येचे प्रवेशद्वारे म्हणजे अंगणवाडी ही सध्या घाणीच्या विळख्यात सापडली आहे. यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अंगणवाडीच्या सभोवती गावातील लोक प्रांतविधीचे प्रतिक्रिया करत असल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायतीकडे विनंती करुनही प्रशासन या प्रश्नाकडे जाणुन बुजून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे लोकांमधून तिव्र नाराजी व्यक्त होते. प्रशासनाकडे तात्काळ यावर उपाययोजना नाही केल्यास याचा परिणाम बालकांच्या आरोग्यावर होईल.
