उस्मानाबाद :- जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांचेतर्फे विशेष घटक योजनेतील सुशिक्षीत बेरोजगार युवक व युवतींसाठी उस्मानाबाद येथे दि. 7 ऑगस्ट ते 06 ऑक्टोंबर, 2014 या कालावधीत मोफत कॉम्प्युटर टॅली  प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे.
    या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संपूर्ण कॉम्प्युटर टॅली व उद्योजकीय अभ्यासक्रम या विषयी दररोज दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तज्ञ मार्गदर्शक व अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
तरी इच्छुक युवक व युवतींनी  प्रवेश अर्ज भरणेसाठी दि.05 ऑगस्टपर्यंत कार्यक्रम समन्वयक  किरण बनसोडे  यांच्याशी जिल्हा उद्योग केंद्र, एमसीईडी ऑफिस,उस्मानाबाद येथे संपर्क साधावा. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8421484482 असा आहे. दि. 06 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती  प्रकल्प  अधिकारी, एम.सी.ई.डी. व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.    
 
Top