उस्‍मानाबाद : टेम्‍पो आणि बसची समोरासमोर जोरदार धडक होवून भीषण अपघातात एका विद्यार्थ्‍यांसह दोघेजण ठार झाले तर १९ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजण्‍याच्या दरम्‍यान घडली. हा अपघात लातूर-बार्शी मार्गावरील उस्मानाबाद जिल्ह्यातील घोगरेवाडी पाटीजवळ घडला.
    आकाश धनंजय डमे  (वय १८, रा. कसबतडवळे, ता. उस्‍मानाबाद), सेवानिवृत्‍त मेजर दशरथ बांगर (वय ४३, रा. बांगरवाडी, ता. कळंब) असे अपघात मरण पावल्‍यांचे नावे असून श्रीकांत उपचंद नोहेकर (30, कळंब), महेन्द्र साबळे (40), सूदर्शन लोहार(30), विकास काळे(35), बसचालक राम जाधव, संगीता शिंदे(40), सुलोचना पंडीत(20), पृथ्वीराज ठाकूर (30), भारत चव्हाण(64), श्याम सूर्यवंशी(32), गणपत राठोड(35), मिनाज शेख(25), प्रकाश शिंदे(65), हर्षद गवळी(16), रमाकांत कसबे(19), वाहक प्रकाश भुरके(35), सादीक शेख असे जखमींचे नावे आहेत.
    बार्शी आगराची एम.एच.०७ सी ७३३३ ही बार्शी-नांदेड बस सोमवारी सकाळी बार्शीहून मुरुडकडे येत असताना समोरून येणा-या एम.एच.१२ एन-२१९९ या क्रमांकाचा आयशर टेम्पो आणि बसची जोरदार धडक बसली. या अपघातात बसमधील चालकाच्या मागील जागेवर बसलेले दशरथ बांगर व आकाश ढगे (हे दोघे जागीच ठार झाले. तर बसचालकासह एकूण 19 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी ९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
    अपघाताचे वृत्तसमजताच भाजपचे हणुमंत नागटिळक यांच्यासह कमलाकर कदम, गणेश दीक्षित, अनंत कणसे , विष्णू घुटे, चंद्रकांत नाडे व इतर नागरिक रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी पोहचले. जखमींना मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या नऊजणांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
 
Top