उस्मानाबाद :- मातंग समाजातील सामाजिक कलात्मक, साहित्य क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तींच्या कामाची दाद घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावे, जेणेकरुन मातंग समाजातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्टया कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक, कलावंत वसाहित्येीक सरसावुन पुढे यावेत, यासाठी शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देण्यात येणार आहे. इच्छुकानी पुरस्कारासाठी आपला प्रस्ताव 8 जुलै पर्यत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद यांच्या नावे पाठवावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, उस्मानाबाद यांनी केले आहे.
मातंग समाजाकरीता समाज कल्याण आणि कलात्मक साहित्यीक क्षेत्रात कार्य तथा कल्याणासाठी झटणारे नामवंत कलावंत, साहित्यीक व समाजसेवक असावेत. समाज कल्याण कलावंत व साहित्यीक क्षेत्रात कमीत कमी 10 वर्षे कार्य केलेले असावेत, पुरुषाचे वय 50 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त वय असावे, स्त्रीसाठीचे 40 वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. कोणत्याही व्यक्तीस त्यांचे आयुष्यात एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही. हा पुरस्कार मातंग समाजातील समाजसेवक, कलावंत व साहित्यीकांनाच देण्यात येणार आहे. पुरस्कार व्यक्तीगत भौतिक कार्यावरुन ठरविण्यात येईल. समाजातील त्याचा पदाचा याबाबत विचार केला जणार नाही. वरील क्षेत्रात कमीत कमी 10 वर्षे वैयक्तिक अभिजात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना देण्यात येणार आहे.
सामाजिक संस्थेसाठी-मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मुलन, अंधश्रध्दा, अंधश्रध्दा रुढी निर्मुलन, जनजागरण आदि क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. स्वयंसेवी संस्था पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 व सोसायटी रजिस्टर ॲक्टर नुसार पंजीबध्द असावी, संस्थाचे समाज कल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य 10 वर्षापासून अधिक असावे. विशेष मौलीक व भरीव काम करणाऱ्या संस्थांच्या बाबतीत अट अट अपवार म्हणून शिथील करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. तिचे कार्य व सेवा ही पक्षातील व राजकारणापासून स्वतंत्र व अलिप्त असावी. मातंग समाज सेवा आणि समाजाचा विकास या क्षेत्रातील कामाचा विचार करुन हा पुरस्कार संस्थेला दिला जातो.
पुरस्कारासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, आपण केलेल्या उकृष्ट कार्याचा तपशिल, विना दुराचार प्रमाणपत्र गैरवर्तनासंबंधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे पोलीस विभागाचे प्रमाणपत्र, इतर पुराव्याचे कागदपत्रे, कात्रणे व तीन पासपोर्ट आकाराचे फोटो आदि माहितीसह प्रस्ताव परिपुर्ण मुदतीत पाठवावेत. अर्जाचा नमुना उपलब्ध असून अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 02472-222014 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.