पांगरी (गणेश गोडसे) :- कारी (ता.बार्शी) येथील स्वस्त धान्य दुकान व रॉकेल विक्री यासंदर्भात ग्रामस्थांच्या वाढत असलेल्या तक्रारींची दखल घेऊन बार्शीचे नायब तहसिलदारांनी गावास रात्री अचानक भेट देऊन गावातील स्वत धान्य दुकान व रॉकेल दुकानांवर छापे टाकुन टाकुन पंचनामे केले. यावेळी दुकानासंदर्भात अनेक त्रुटी आढळुन आल्या आहेत. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार योग्य ती रितसर कारवाई करून ग्राहकांना न्याय मिळवुन देऊ असे आश्‍वासन दुकान तपासणीवेळी ग्रामस्थांना देण्‍यात आले.
    स्वस्त धान्य दुकानातील बार्शी तालुक्यातील गोंधळ चांगलाच गाजत आहे. कारी येथील ग्रामस्थांनी गावातील स्वस्त धान्य दुकानासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. बार्शीचे नायब तहसिलदर उत्तम पवार यांनी रात्री सात वाजता कारीला अचानक भेट देत दुकानांची तपासणी केली. तहसिलदारांच्या तपासणीत ग्राहकांना दुकानदारांकडुन खरेची कोणतीही रितसर पावती दिली जात नाही, शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या अन्नसुरक्षा योजनेची गावात अंमलबजावनीच नाही, दुकानांवर नामफलक परवाना क्रमांक दुकान उघडण्‍याची अथवा बंद करण्‍याची वेळ नाही. दुकानात शिल्लक धान्यसाठयाचा फलक नाही तर कांही दुकानात फलकच नाही. रॉकेल दुकानासंदर्भातही अशाच गंभिर चुका निदर्शनास आल्या. रॉकेल शासकीय नियमांप्रमाणे वितरीत न करता जादा दराने वितरीत केले जाते, मयत कोटयातुन सुध्‍दा २० रूपये दराने रॉकेल वाटप केले जाते. तहसिलदार गावात आल्याची नामी संधी साधत ग्रामस्थांनी दुकानासंदर्भातील आपल्या तक्रारींचा पाढाच त्यांच्यासमोर वाचुन अन्याय दुर करण्‍याची मागणी केली. उपस्थित असंख्य ग्रामस्थांनी तहसिलदारांवर दुकानासंदर्भात असंख्य प्रश्‍नांची सरबत्ती केली.
    यावेळी तहसिलदार पवार म्हणाले की, कारीतील दुकानदार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत आहेत. दुकानात गहु, तांदुळ सांडलेले आढळुन आले. रॉकेल बाबतही नियम धाब्यावर बसवल्याचेच दिसुन आले. गावात ग्रामपंचायत मार्फत दक्षता कमीटीची नेमणुक गरजेची असुन त्यांच्या सहीनेच वितरणासाठी आलेला माल वितरीत केला गेला पाहीजे. मात्र याबाबत कारी ग्रामपंचायत फारसे गांभिर्याने पहाताना दिसत नसुन अन्न सुरक्षा कायदयाची अंमलबजावणी व त्यातील नावांची यादी ग्रामसभेत वाचुन दाखवणे हे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे, आदी कायदयाबाबत त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. यावेळी कारी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ वत क्रारदार उपस्थित होते.
    वरिष्ठ प्रशासनाच्या अधिका-यांच्या पाठराखनीमुळे निर्ढावलेले स्वस्त धान्य दुकानदार बार्शी तालुक्यातील ग्राहहकांना मोगलाई पद्वधतीने लुटत असुन कुठेही तक्रारी अर्ज करा, अर्ज कसा निकाली काढायचा याची कला आमच्या नसानसात भिनली असल्याचे स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांना उघडपणे बोलत असुन लोकांचे मनाधैर्य खचत आहे. वरीष्ठांनी यात लक्ष घालुन लोकांना न्याय देणे गरजेचे आहे.
 
Top