नळदुर्ग -: येथील सय्यद कौसर पाशा जहागिरदार यांनी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. ते तुळजापूर विधानसभा निवडणुक लढवणार असल्‍याचे मनोदय व्‍यक्‍त केले असून त्‍यामुळे तुळजापूर विधानसभा मतदार संघात निवडणुक लढवू इच्छिणा-या इच्‍छुक उमदेवारांची मोठी संख्‍या होत असून जिल्‍ह्यातील एकमेव या मतदार संघात उमेदवारी जाहीर होण्‍यापूर्वीच बहुरंगी चित्र दिसत आहे.
      नळदुर्गचे हाफीज  सय्यद कौसरपाशा जहागिरदार यांचा तुळजापूर मतदार संघात मोठा जनसंपर्क आहे. त्‍यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक कार्य, क्रीडा तसेच इतर अनेक उपक्रम राबविले अाहेत. मुस्लिम बरोबरच हिंदूमध्‍ये देखील त्‍यांचे समर्थक मोठ्या संख्‍येनी आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍या मनसे प्रवेशामुळे तुळजापूर तालुक्‍यात महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पक्ष बळकट होण्‍यास हातभार लागेल यात शंकाच नाही. 
     तालुक्‍यात ज्‍या गतीने महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना वाढायला पाहिजे होती, तेवढ्या गतीने ती वाढली नाही. त्‍यामुळे तालुक्‍याच्‍या राजकारणात मनसेची अवस्‍था अतिशय नगन्‍य होती. मनसेचे जिल्‍हाध्‍यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्‍हा सचिव अमरराजे परमेश्‍वर कदम, तालुकाध्‍यक्ष श्‍याम माळी, नळदुर्ग शहराध्‍यक्ष ज्‍योतीबा येडगे, परिवहनचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष बशीर शेख यांच्‍यासह तालुक्‍यातील इतर पदाधिकारी, कार्यकर्त्‍यांनी तालुक्‍यात मनसे टिकवुन ठेवली आहे. मात्र ज्‍याप्रमाणे मनसेचा दबदबा आज राज्‍यात आहे, तसा दबदबा तुळजापूर तालुक्‍यात निर्माण झाले नाही. जहागिरदार यांच्‍या प्रवेशामुळे तालुक्‍यात पक्षाला बळकटी मिळणार आहे. मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे यांच्‍या नेतृत्‍वावर विश्‍वास ठेवून तसेच राज्‍याचा विकास राज ठाकरे हेच करु शकतात.  हाफीज सय्यद कौसर पाशा जहागिरदार यांनी मनसेत प्रवेश केल्‍याने तुळजापूर मतदार संघाच्‍या निवडणुकीत अन्‍य प्रमुख राजकीय पक्षासमोर मनसेने आव्‍हान उभे करण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.  जहागिरदार यांनी मनसेकडून तुळजापूर विधानसभा निवडणुक लढवण्‍याचा मानस व्‍यक्‍त केला आहे.
 
Top