उस्मानाबाद : जिल्हा परिषदेअंतर्गत येडशी येथील ग्रामविकास अधिकारी आणि भंडारवाडी आणि मेडसिंगा येथील ग्रामसेवक यांना गटविकास अधिका-यांनी कामकाजात अनियमितता, निष्काळजीपणा, अनधिकृत गैरहजर राहणे यासह विविध कारणांसाठी निलंबित केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.   
      उस्मानाबाद तालुक्यातील ग्रामपंचायत, येडसी येथील ग्रामविकास अधिकारी एस. एस. भुसे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लेखा परिक्षणासाठी अभिलेखे वेळीच सादर न करणे, ग्रामपंचायतीच्या कामकाजात अक्षम्य अनियमितता करणे, अभिलेखे अदयावत न ठेवणे, मासिक/ पाक्षिक बैठकीस गैरहजर राहणे, अहवाल मुदतीत सादर न करणे, सज्जावर अनाधिकृत गैरहजर राहणे आदि विविध कर्तव्यात  कसूर  केल्याबाबत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, उस्मानाबाद यांनी एका आदेशान्वये निलंबित केले आहे.           
भंडारवाडी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती एस. व्ही. गायकवाड  यांनी  अभिलेखे अदयावत न  ठेवणे, ग्रामपंचायतीच्या कामकाजात अक्षम्य अनियमितता करणे, मासिक/ पाक्षिक बैठकीस गैरहजर राहणे, अहवाल मुदतीत सादर न करणे आदि कामात  कसूर  केल्याबाबत शिस्तभंगाची कार्यवाही करुन श्रीमती गायकवाड  यांना  निलंबित करण्यात आले आहे.   
     मेडसिंगा  येथील ग्रामसेवक एन. पी. काकडे  यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लेखा परिक्षणासाठी अभिलेखे वेळीच सादर न करणे,  अभिलेखे अदयावत न  ठेवणे, ग्रामपंचायतीच्या कामकाजात अक्षम्य अनियमितता करणे, मासिक/ पाक्षिक बैठकीस गैरहजर राहणे, अहवाल मुदतीत सादर न करणे आदि कामात  कसूर  केल्याबाबत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.         
 
Top