उस्मानाबाद :- सन 2014-15  या वर्षासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात इंदिरा आवास योजनेच्या 1 हजार 480 व रमाई आवास योजनेच्या 722 असे एकुण 2 हजार 202 घरकुलाच्या कामास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  सुमन रावत यांनी प्रशासकीय मंजूरी दिली आहे.
    इंदिरा आवास योजनेअंतर्गत तालुकानिहाय मंजूर घरकुलांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. उस्मानाबाद तालुक्यात 295 घरकुले बांधण्यात येणार असून तुळजापूर तालुकयात 310, उमरगा तालुक्यात 176, लोहारा तालुक्यात 86, कळंब तालुक्यात 244, वाशी तालुक्यात 78,भूम तालुक्यात 153 व परंडा तालुक्यात 138 घराकुले बांधण्याच्या कामास मंजूरी देण्यात आली आहे.
    तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत  उस्मानाबाद तालुक्यात 216 घरकुले बांधण्यात येणार असून तुळजापूर तालुक्यात 255, उमरगा 47, लोहारा 47, कळंब 50, वाशी 69,भूम 39 व परंडा तालुक्यात 29 घरकुलांच्या बांधकामाचा समावेश आहे. प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या लाभधारकांच्या यादया संबंधित पंचायत समितीच्या नोटीस बोर्डावर डकविण्यात आलेल्या आहेत. तसेच या यादया www.osmanabad.nic.in वर देखील उपलब्ध आहेत.
         मंजूर यादीतील लाभधारकांनी पंचायत समितीशी संपर्क साधून कागदपत्राची पूर्तता करुन घ्यावी व राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून करारनामा करुन घ्यावे. तदनंतर घरकुलांची कामे सुरु करावीत, असे आवाहन प्रकल्प संचालक, उस्मानाबाद यांनी केले आहे. 
 
Top