उस्मानाबाद :- बेंबळी,केशेगाव आणि पाडोळी (अ) या महसूल मंडळातील नागरिकांनी पाडोळीच्या ग्रामपंचायतीच्या प्रांगणात गर्दी केली होती. प्रशासनाशी निगडीत असलेले आपले काम तात्काळ होतेय, याचाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. महसूल, आरोग्य, शिक्षण, कृषी आणि समाजकल्याण अशा नागरिकांच्या थेट हिताशी निगडीत असणाऱ्या विविध विभागांच्या योजनांची यशस्वी व्हावी, यासाठी राबविलेल्या राजस्व अभियान उपक्रमाच्याचे आयोजन केले होते. एकाच छत्राखाली आलेले विविध विभाग आणि त्यातून जनतेची होणारी तात्काळ कामे करुन घ्यावतीत यासाठी राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले होते.
गावात राजस्व अभियान-2014 अर्थात प्रशासन जनतेच्या दारी या उपक्रमाचे. या उपक्रमाचे उदघाटन शनिवार दि. 19 एप्रिल रोजी मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, विश्वास शिंदे,जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर गुंड, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय सोनटक्के, लक्ष्मण सरडे, तहसीलदार सुभाष काकडे, अॅड.व्यंकटराव गुंड, सरंपच सौ.काशीबाई काळे, उपसरपंच सुलभा व्यंकट गुंड, माजी सरपंच रावसाहेब गुंड, नायब तहसीलदार राजेश जाधव आदिंची उपस्थिती होती.
शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना थेट लाभ मिळावा, प्रशासनाविषयी असणारी नकारात्मक मानसिकता नाहिशी होऊन सकारात्मक दृष्टीकोनातून नागरिकांची कामे व्हावीत हा या समाधान योजना उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पाडोळी महसूल मंडळातील नागरिकांनी याठिकाणी केलेल्या गर्दीने ही अपेक्षा सार्थ ठरवली.
पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी शासन आपल्या दारी येऊन विविध विभागाचे अधिकारी या मोहिमेतून शासनाच्या योजनांची माहिती देत असतात. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. जनहिताच्या विविध शासन योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत घेऊन जाते, ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी महावितरणच्या कृषि संजीवनी योजनेचा लाभ घ्यावा. यावेळी त्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात विविध योजनातील लाभार्थींना प्रमाणपत्रे, नवीन शिधापत्रिका, अन्न सुरक्षा योजनेसाठी लागणारे कार्ड,जातीचे, नॉनक्रिमीलीयर, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि जुलै महिन्यात अचानक वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या (अंजनाबाई) यांचे पती सौदागर निवृत्ती राऊत, ताकविकी यांना तहसील कार्यालयाकडून 1 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी हा उपक्रम आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. तसेच लोकांच्या समस्या एकत्र येऊन सोडविणेसाठी वारंवार बैठकांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून गावातील अडचणी गावात सोडविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामपंचायत व देवीच्या प्रांगणात आरोग्य, कृषी, शिक्षण, समाजकल्याण तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची दालने उघडण्यात आली होती.त्या-त्या ठिकाणी संबंधित नागरिकांना त्यांना आवश्यक ती कागदपत्रे देण्यात येत होती. विविध योजनांसाठी असणारे अर्ज भरुन घेण्यात येत होते. पालकमंत्री चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्यासह इतर मान्यवरांनी या सर्व दालनांना भेटी देऊन नागरिकांना देण्यात येत असणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.
नागरिकांनी आधार कार्ड नोंदणी, मतदार यादीत नाव नोंद करणे, नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणे, संजय गांधी-श्रावण बाळ निराधाराच्या यादीत नाव समाविष्ट करणे,शिकाऊ अनुज्ञप्ती व वाहतूकीचे नियम, वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आणि विद्यार्थी लाभार्थी योजनेस सर्वाधिक प्रतिसाद दिला. गावात प्रथमच आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व योजनांच्या माहितीचा चित्ररथ सर्वांचे आकर्षण ठरले.
यावेळी विश्वासअप्पा शिंदे आणि सुधाकर गुंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या उपक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार सुभाष काकडे यांनी करुन राजस्व अभियानाच्या माध्यमातून प्रशासन हे जास्तीत जास्त लोकाभिमुख होईल, यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन धनजंय गुंड यांनी तर आभार अॅड. व्यंकटराव गुंड यांनी मानले. याप्रसंगी पाडोळी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह बेंबळी, केशेगाव भागातील नागरिकानीही येथे मोठया प्रमाणात हजेरी लावली होती.
पालकमंत्री मधुकरराव चव्हाण आणि जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी पाडोळी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन वृक्षारोपन केले. त्यांच्या समवेत विविध अधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.