तुळजापूर :- राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आज शनिवार दि. 19 जुलै रोजी तुळजापूर शहारास भेट दिली. तुळजापूर येथील बसस्थानक ते आंबेडकर चौक फुटपाथची पाहणी करुन फळविक्रेते व फेरीवाल्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडवण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, प्राधिकारणचे सदस्य अप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य धीरज पाटील, भारत कदम, विश्वास इंगळे व नगर पालिकेचे मुख्याधिकारी आदीजण उपस्थित होते.
