उस्मानाबाद :- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला लोकशाही दिनाचा संबंधित महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, त्यांचे तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शन व्हावे, यासाठी शासन जिल्हास्तर व तालुकास्तरावर महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.