उस्मानाबाद -: भारतीय शुर सैनिकांनी कारगील युध्दात व संकटाप्रसंगी आपल्या कुटूंबाची तमा न बाळगता देशासाठी काम केले आहे. त्यांचा राष्ट्र घडविण्यात सिंहाचा वाटा आहे. त्या माजी सैनिकांच्या वैयक्तीक व सामाजिक अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले.
    कारगील विजय दिनाचे औचित्य साधून येथील जिल्हा परिषदेच्या कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, कर्नल श्री. देशमुख, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर निवृत्त सुभाष सासणे, समादेशक एस.आर.बरडे आदींची उपस्थिती होती.
    युद्धात शौर्य गाजवून धारातीर्थी पडलेल्या जवानांनी देशासाठी काम केले आहे. देशाची सेवा करुन माजी सैनिक जेव्हा आपल्या घरी परतात तेव्हा त्यांना आधार देण्याचे कार्य आपणा सर्वांकडून झाले पाहिजे. त्यांच्या वैयक्तीक व समाजोपयोगी समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील, अशी भावना डॉ.नारनवरे यांनी व्यक्त्‍केली. यापुढील काळात  गावाला व्यसनमुक्त करणे, तंटामुक्त करणे अशा विविध अभियानात  माजी सैनिकांचा समावेश करुन त्यांच्याकडून चांगल्या प्रकारचे कार्य करुन घेतले जाईल,असेही डॉ.नारनवरे यांनी सांगितले.
    श्री. पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले की, गावाच्या विकासासाठी प्रत्येकाचे योगदानाबरोबरच आरोग्यासाठी शौचालय, व्यसनमुक्ती, तंटामुक्ती अशा अभियानात माजी सैनिकाबरोबरच सर्वांना एकत्र घेऊन गावाचा विकास करावयाचे आहे. माजी सैनिकांच्या वैयक्तीक व सामाजीक अडचणी सोडविण्यासाठी स्वतंत्र यादी तयार करावी. जेणेकरुन तात्काळ अडचणी सोडविणे सोईचे होईल, याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
    माजी सैनिकांनी त्यांचे वैयक्तिक आणि त्यांच्या पाल्यांचे स्मार्ट कार्ड स्वतंत्ररित्या काढावेत, त्यामुळे रुग्णांवर स्वतंत्रपणे उपचार करणे सोईचे होईल, असे मत कर्नल देशमुख यांनी मांडले.
    श्री.चारठाणकर यांनी, पालिका हद्दतील माजी सैनिकांच्या समस्या तात्काळ सोडविल्या जातील. तसेच माजी सैनिकांची सेवा नगरपरिषदेच्या अत्यावश्यक सेवेमध्ये मानधन तत्वावर करुन घेणे, नगरपरिषद हद्दीतील जागेचा प्रश्न सोडविणे, मालमत्ता करामध्ये माजी सैनिकांना करात सवलत देणे, यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यासाठी माजी सैनिकांनी सकारात्मक सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
    यावेळी माजी सैनिकामार्फत आनंद शिंगाडे, राजेंद्र सुर्यवंशी, श्री. कुलकर्णी आणि   शहाजी चालुक्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
    प्रास्ताविकात मेजर (नि) सासणे यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी केलेले आक्रमण भारतीय शुर सैनिकांनी खांद्यास खांदा लावून शत्रुशी झूंज देवून परतावून लावले. या युध्दास आज 15 वर्षे पुर्ण झाली. कारगिल युध्दात शहीद झालेल्या शूर सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत सरकारने कारगिल विजय स्मृति दिवस साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी माजी सैनिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी विविध योजनांबाबतही माहिती दिली.
   यावेळी शेख कोंडाजी मोहमद शेख (स्वयंरोजगारासाठी आर्थीक मदत),  बापू डावकरे (पाल्याचा शैक्षणिक खर्चासाठी), फावडे संदीपान (एम.एस.सी.आय.टी.करीता),  राम जाधव, हनुमंत सितापूरे, शेषेराव जाधव, आणि श्रीमती महानंदा लिंबनाथ सां‍ळूके यांना (मुलीच्या विवाहासाठी मदत), यांना तसेच श्रीमती लक्ष्मी काशीनाथ परीट, श्रीमती सरस्वती चंद्रसेन विधाते, बाबुराव पवार यांना (पतिच्या अंतविधीची अनुक्रमे आर्थीक मदत) या माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना कल्याणकारी निधीचे वाटप जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
    कार्यक्रमाच्‍या सुरुवातीला सर्व उपस्थितांनी शहीद झालेल्या सैनिकांना श्रध्दांजली वाहिली. शहीद शिरीषकुमार भिसे यांच्या पत्नी मिनाक्षी भिसे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
      जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर(नि) सासणे यांच्यासह सैनिक कल्याण कार्यालयातील डी.बी.काळे, ए.के.मेंगशेट्टी, रमेश गलांडे, बी.एन.शेंडगे, राजेंद्र साळुंखे, आर.के. बचुते, मनोजकुमार खोपे, के.एम.सुर्यवंशी आणि महादेव सुतार आदिंनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी राजेंद्र अत्रे यांनी तर आभार श्री.सासणे यांनी मानले.
 
Top