पांगरी (गणेश गोडसे) :- दुष्काळी परिस्थतीच्या पार्श्‍वभुमीवर शेतक-यांचा आगाताचा हंगाम वाया जाण्‍याची चिन्हे असुन शेतक-यांनी पिक विमा भरण्‍यासाठी बँकामध्ये एकच गर्दी केली असुन पिक विम्याची मुदत वाढवुन मिळावी अशी बार्शी तालुक्यातील शेतक-यांची मागणी आहे. पीक विमा भरण्‍यासाठी बरेच सोपस्कर पार पाडावे लागत असल्यामुळे व त्यासाठी बराच काळ जात असल्यामुळे मुदतवाढ मिळणे गरजेचे आहे.
     शेतक-यांनी अल्पशा ओलीवर काळया आईची ओटी भरली असुन पिकांची उगवण झाली आहे. इतर भागात पर्जन्यवृष्ठी सुरू असताना बार्शी तालुका मात्र कोरडाच राहीला आहे. शासनाने सुरू केलेल्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेतुन उडीद, मुग, सोयाबिन, तुर, सुर्यफुल, भुइमुग, भात हुलगा, मटकी, बाजरी, कांदा आदी पिकांचा विमा उतरवण्‍याचे काम सुरू असुन पिक विमा भरण्‍याची अंतिम मुदत ३१ जुलै ही ठरवण्‍यात आली आहे. त्यामुळे पिक विमा भरण्‍यासाठी शेतक-यांची एकच धांदल उडाली आहे. बँकामधुन इतर कामांना फाटा देऊन पिक विमा भरून घेण्‍यासाठी विशेष उपाययोजना राबुन त्यासाठी स्वतंत्र टेबलांची यंत्रणा तयार करण्‍यात आली आहे. पिक विमा भरण्‍यासाठी एकच दिवसाचा कालावधी शिल्लक राहीला असल्यामुळे बँक कर्मचा-यांसह शेतक-यांना त्रासदायक ठरत आहे. शेतक-यांच्या रांगा बँकेतुन दुरपर्यंत बाहेर पडुन रस्त्यांवर आल्याचे निदर्शनास येत आहे. पिक विमा भरणा-या शेतक.यांची संख्या अजुनही मोठया प्रमाणात शिल्लक असुन शासनाने पिक विमा भरून घेण्‍यासाठी मुदतीत वाढ करावी असा सुर शेतक-यांमधुन उमटत आहे.
    अगोदरच दुष्काळी परिस्थती त्यात पुरेश्या ओलीमुळे बियानांची उगवण झाली नाही. ज्यांच्या बियानांची उगवण झाली ती पिके पावसाअभावी माना टाकु लागली आहेत. पिकांची अवस्था भयावह असल्यामुळे किमान यावर्षी तरी पिक विम्याचा आधार मिळेल अशी आशा शेतकरी बाळगुन आहेत. मात्र पिक विमा भरूनही तो मिळेलच याची शाश्‍वती नसल्यामुळे ब-याच शेतक-यांनी याकडेही पाठ फिरवल्याचे दिसत आहे. चार वर्ष विमा भरल्यानंतर एकांदयावेळीच शेतक-याला विमा मिळतो असे शेतक-यांचे म्हणणे आहे. शेतक-यांचेच पैसै गोळा करून परत शेतक-यांना फिरवले जाते.
 
Top