उस्मानाबाद :- समाजकल्याण विभागाची जिल्ह्यातील वसतीगृहे आता आमूलाग्र बदलणार आहेत. केवळ विद्यार्थ्यांच्या निवासी व्यवस्थेपुरते असणारे हे वसतीगृह आता विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाचे केंद्र बनणार आहे. एका आठवड्यात जिल्ह्यातील सर्व वसतीगृहात याची सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी योगा, क्रीडा विषयक मार्गदर्शन, आपत्ती व्यवस्थापन या विषयांबरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग नियमितपणे सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत.
डॉ. नारनवरे यांनी जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या सर्व वसतीगृह अधीक्षकांची बैठक घेऊन त्यांना तात्काळ याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अनिल शेंदारकर यांची यावेळी उपस्थिती होती.
केवळ पारंपरिक पद्धतीने या विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था केली म्हणजे समाजकल्याण विभागाची जबाबदारी संपत नाही. या विद्यार्थी-विद्यार्थींनींच्या व्यक्तीमत्व विकासासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठीचे उपक्रम वसतीगृहात राबविले गेले पाहिजेत. त्यामुळे तात्काळ वसतीगृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु करा. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे प्रमुख यांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित करुन परीक्षा पद्धती अभ्यास कसा करावा, याबाबतची माहिती त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना होऊ शकेल. याशिवाय, विविध विभागांमधील पदे, तेथील रोजगारसंधी याची माहितीही विद्यार्थ्यांना मिळू शकेल. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासाचे दालन खुले होणार आहे. उपलब्ध साधनसामुग्रीचा विधायक वापर करुन घेण्याबाबत त्यांनी श्री. शेंदारकर आणि सर्व गृहपालांना सांगितले.
वसतीगृहात वर्तमानपत्रांसह अवांतर वाचनासाठी संदर्भ मूल्य असणारी पुस्तके उपलब्ध करुन द्या. वसतीगृहातील स्वच्छता, शिस्त आण सुरक्षा या गोष्टींना मात्र सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शिस्तबद्ध विद्यार्थ्यांचे कौतुक आणि शिस्त बिघडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई हे सूत्र वापराबाबत त्यांनी स्पष्टपणे बजावले. मोठ्या संख्येने विद्यार्थी वसतीगृहात राहतात. त्यांची शैक्षणिक पात्रता पाहून त्याठिकाणी करिअर आणि रोजगार मेळावा आयोजित करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या. याशिवाय, तालुकास्तरीय सर्व महत्वाच्या विभागांचे आणि अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक वसतीगृहात लावण्याच्या सूचनाही डॉ. नारनवरे यांनी दिल्या.