नळदुर्ग : येथील नगरपालिकेच्‍या नगराध्यक्ष पदाच्या होणा-या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून सौ. मंगल उध्दव सुरवसे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेविका सौ. कुरेशी सुफिया म. युसूफ यांनी आपले नामनिर्देशन पत्र शुक्रवार रोजी दाखल केले आहे.
    नळदुर्ग नगरपालिकेचे पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिला या राखीव प्रवर्गासाठी आहे. नगरपालिकेत काँग्रेसचे ९ व राष्ट्रवादीचे ६, शिवसेना १ अशी पक्षीय बलाबल आहे. राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचे नुकतेच निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सौ.मंगलताई सुरवसे यांचीच वर्णी लागणार हे निश्चित झाले आहे. नगरसेविका सौ.सुरवसे ह्या प्रभाग क्रं ३ मधुन निवडुन आल्या आहेत.
    पालिका सभागृहात निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी ए.एल.लाटकर यांनी दोन्ही पक्षाच्या उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेतले. यावेळी मावळते नगराध्यक्ष शहबाज काझी, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नवाज काझी, राष्ट्रवादी गटनेते नय्यर जहागिरदार, माजी नगराध्यक्ष शब्बीरअली सय्यद, उपनगराध्यक्षा सौ. अपर्णा बेडगे, नगरसेवक दयानंद बनसोडे, सचिन डुकरे, इमाम शेख, सुप्रिया पुराणिक, सुधीर हजारे, संजय दळवी, राजेंद्र महाबोले, अजित पंडीत, सुभाष महाबोले, संदीप सुरवसे आदी उपस्थित होते.
 
Top