पांगरी (गणेश गोडसे) :- आपल्या वस्तीकडे म्हशी घेऊन जात असताना म्हशी विद्युतप्रवाह सुरू असलेल्या विज वितरण कंपनीच्या पोलच्या ताराला चिकटल्यामुळे एका दुध उत्पादक शेतक-याच्या दोन म्हशी जागेवरच ठार होऊन एक लाख रूपयांचे नुकसान झाल्याची घटना बावी (आ) ता.बार्शी येथील शिवारात घडली.
पांडुरंग शिवदास दळवी (रा. बावी) असे दोन म्हशी मृत्युमुखी पडुन आर्थिक नुकसान झालेल्या शेतक.यांचे नांव आहे. पांडुरंग दळवी हे आपल्या म्हशी घेऊन बिरोबा वस्तीकडे घेऊन जात होते. दरम्यान विदयुत प्रवाह उतरलेल्या पोलच्या तानाला घासुन म्हशी जात असताना विजेचा धक्का म्हशींना लागला. विदयुतप्रवाह म्हशींच्या अंगात उतरल्यामुळे दोन म्हशी जागेवरच मृत्युमुखी पडल्यामुळे दळवी यांचे एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.