पांगरी (गणेश गोडसे) -: विहीरीत पाणी आणण्‍यासाठी गेलेल्या एका नवविवाहीतेचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटणा तावडी ता.बार्शी) येथे घडली.
    सौ. सुलभा दतात्रय मोरे (वय २०, रा.तावडी) असे पाण्यात बुडुन मृत्युमुखी पडलेल्या नवविवाहीतेचे नांव आहे. प्रकाश अंगद मोरे (वय ३५, रा.तावडी) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, मयत सुलभा मोरे ही त्यांच्या रहात्या घरासमोरील सार्वजनिक विहीरीवर पिण्यासाठी पाणी आणण्‍यास गेली होती. पाणी आणण्‍यास गेल्यानंतर त्यांचा पाय घसरूण पाण्यात पडुन बुडुन त्यांचा मृत्यु झाला. प्रकाश मोरे यांनी दिलेल्या खबरीवरून पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणुन गुन्हा दाखल करण्‍यात आला असुन अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top