बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांनी आपण पूर्व परीक्षा देतांना मुख्य परीक्षेचा विचार डोक्यात आणू नये, मुख्य परीक्षेनंतर घेण्यात येणार्या मुलाखतींची चिंता डोक्यातून काढून टाकावी, कारण ही सर्वात सोपी परीक्षा आहे. ही परीक्षा देतांना आपण कधीही खोटे बोलू नये, या परीक्षेत आपले विविध गुणदर्शन तसेच आपले ज्ञान किती आहे हे पाहिले जाते. विषयांची निवड काळजीपूर्वक करा, आत्मविश्वास व मेहनतीच्या जोडीने आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकता असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडामयांनी केले.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी व रोटरी क्लब बार्शी शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यातील युपीएस्सी व एमपीएस्सीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तहसिलदार बालाजी सोमवंशी, डॉ. काका सामनगावकर, रोटरीचे अध्यक्ष गौतमकांकरिया, इंडियन रेडक्रॉसचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, डॉ.बी.वाय.यादव, रोटरीचे सचिव संदिप सुराणा, सुभाष जवळेकर आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धा परीक्षेतील गुणवंत वरुणकुमार बरुणवाल, हेमंत पाटील, मयुर गोवेकर, संजय खरात, हिमालय देवकाते, सुजीत कानडे, सागर कोळी, तात्याासहेब मारकड,हृषिकेश उत्पात, राजकुमार जाधव, सुप्रिया कोरके, अमोल जाधव, रविराज खोगरे, सचिन भोसले, श्रीकृष्ण नकाते, मिताली संचेती यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
डॉ.प्रविण गेडाम म्हणाले, बारावीच्या परीक्षेत गणित व शास्त्र या दोन्ही विषयांची परीक्षा देऊन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी पर्याय ठेवले, यानंतर वैद्यकिय क्षेत्रातील एमबीबीएस पदवी प्राप्त केली व नोकरीही मिळाली, विविध प्रकारचे शैक्षणिक अपघात अनुभवल्यानंतर योगायोगाने स्पर्धा परीक्षांचा फॉर्म भरला, अनेक शैक्षणिक अपघाताचे प्रसंग आल्यावर देवासारखे कोणीतरी मदत करत होते. जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी स्विकारल्यावर धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात श्रीक्षेत्र तुळजापूर व सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र पंढरपूर आदी देवस्थानांच्या अडचणी सोडविण्याची संधी मिळाली यात मला आनंद मिळाला. वरुणकुमार बरणवाल म्हणाले, घरची परिस्थिती नसल्याने परीक्षेची फी भरणेदेखिल मुश्किल होते परंतु या जगात चांगली माणसे देखिल असल्याने त्यांनी देवासारखी प्रत्येक वेळी मदत केली. मयुर गोवेकर म्हणाले, बार्शी शहरातून शिक्षणाची चळवळ उभी रहात आहे, रमेश घोलप सारखे यशस्वी लोक ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रेरणा देत आहेत, ग्रामीण अर्थव्यवस्था, जातीव्यवस्था, गावातील एक गाव तसेच गावकुसाबाहेरील एक गाव, स्त्रीयांचे प्रश्न, शेतकर्यांच्या आत्महत्या यासारख्या अनेक ज्वलंत प्रश्नांना पुस्तकातून शिकण्याऐवजी जवळून पाहण्याचे प्रसंग येतात त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे सामाजिक शिक्षण चांगले पक्के असते त्यामुळे एम्पथी ऐवजी सिम्पथी पहायला मिळते. दुसर्यांच्या अडचणीत मदत करण्याची भूमीका ग्रामीण भागात दिसून येते. प्रत्येकाचे चांगले गोळा करुन पुढे जाण्याचा प्रयत्न करावा.
हिमालय देवकाते म्हणाले, सोलापूर सारख्या जिल्ह्यात गेडामयांना जबाबदारी मिळाली आहे, या ठिकाणी कामकरणे अवघड गोष्ट आहे. कोणताही क्लास लावला नाही, क्लासेसमध्ये अनेक अनुभव पहायला मिळतात. विद्यार्थ्यांनी स्वत:ची क्षमता ओळखावी, कष्टाची तयारी ठेवावी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज भासते, परीक्षेचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका हे कायमखिशात ठेवल्यास अंधारात बॅटरीचे कामहोते. अवांतर वाचन, वर्तमानपत्रातील लेख व तज्ञांचे विचार यामुळे चांगला उपयोग होतो. शिक्षण क्षेत्र हायटेक होत आहे प्रत्येकाने इंटरनेटची सुविधा सोबत ठेवावी, महाराष्ट्रातील मुले खूप हुशार असल्याचे अनेक स्पर्धा परीक्षेत दिसून येत आहे योग्य मार्गदर्शन केल्यास आणखी जास्त प्रमाणात यश मिळेल. प्रास्ताविकात अजित कुंकूलोळ म्हणाले, रेडक्रॉसच्या वतीने लवकरच स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका सुरु करण्यात येत आहे यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. ग्रामीण भागातील जास्तीतजास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्यासाठी विशेष प्रयत्न करु यासाठी विविध क्षेत्रातील अनेक तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करण्यात येईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिप प्रज्वलन करण्यात आले, सूत्र संचलन स्नेहल कुंकूलोळ व श्रीधर कांबळे यांनी केले तर आभार संदिप सुराणा यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय दिवाणजी, संतोष कौलवार, उदय पोतदार, अशोक डहाळे, प्रशांत बुडूख, कपिल हिंगमिरे, सागर वायकर, बापू ननवरे, ताजुद्दीन सय्यद, दिपक डमरे, चंद्रकांत गायकवाड यानी विशेष परिश्रम घेतले.