नळदुर्ग -येथील राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाज आरक्षण कृती समीतीच्यावतीने गुरूवार रोजी चक्काजाम अंदोलन करण्यात आले
धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी दि. 14 ऑगस्ट रोजी सर्वत्र धनगर समाजाच्यावतीने चक्काजाम करण्यात आले. नळदुर्ग येथेही धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने बसस्थानकरसमोर राष्ट्रीय मार्गावर माजी जि.प. सदस्य गणेश सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुनिल बनसोडे, ज्ञानेश्वर घोडके, पद्माकर घोडके, दिपक घोडके, जोतिबा येडगे, विलास येडगे, सुहास येडगे, दत्तात्रय भाळे, मारूती घोडके, रमेश घोडके, सचिन घोडके, अमित शेंडगे, अमर शेंडगे, सुर्यकांत घोडके यांच्यासह धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी बोलताना गणेश सोनटक्के यांनी यांनी म्हटले की, सरकारने धनगर समाजावर नेहमीच अन्याय केला आहे, त्यामुळे या सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत असून येणा-या विधानसभा निवडणुकीपूर्वी या सरकारने धनगर समाजास एस.टी. प्रवर्गात समावेश केला नाही तर विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला किंमत मोजावी लागेल असे सांगुन जिल्हयाचे पालकमंत्री तसेच राज्यमंत्रीमंडळात कॅबीनेट मंत्री आहेत, मात्र राज्यमंत्रीडळाच्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भत आपले तोंड उघडले नाही, असा पालकमंत्री काय कामाचा अशी टिका करून धनगर समाजाची आरक्षणाची मागणी सरकारने मान्य केली नाही तर येणा-या काळात समाजाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचेही गणेश सोनटक्के यांनी म्हटले आहे.
यावेळी जोतिबा येडगे, पद्माकर घोडके, ज्ञानेश्वर घोडके, सुनिल बनसोडे, सचिन घोडगे, शशिकांत घोडके, यांनीही राज्यसरकारचा जाहीर निषेध करून धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असलयाचे त्यांनी सांगितले. चक्काजाम आंदोलनानंतर धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने मंडळ अधिकारी ए.एस गांधले यांना निवेदन दिले.