सोलापूर - माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 16 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता होम मैदान, सिध्देश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या 765 के.वी, सोलापूर – रायचूर पारेषण लाईनचे तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे निर्मित पुणे – सोलापूर राष्ट्रीय राजमार्ग 9 चे राष्ट्राला समर्पण केले जाईल.
सोलापूर – कर्नाटक सीमा राष्ट्रीय राजमार्ग 9 चा कोनशिला अनावरण समारंभ पंतप्रधान महोदयांच्या हस्ते करण्यात येईल
याप्रसंगी महाराष्ट्राचे मा. राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मा. केंद्रीय सडक परिवहन, राजमार्ग, जहाजरानी, ग्रामीण विकास पेयजल आणि स्वच्छता मंत्री नितिन गडकरी, मा. केंद्रीय विद्युत कोयला आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) पीयुष गोयल, विद्युत मंत्रालय सचिव पी.के. सिन्हा, पावरग्रिडचे अध्यक्ष व प्रबंध निदेशक आर.एन. नायक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष आर.पी. सिंह आणि इतर मान्यवर देखील उपस्थित राहतील असे प्रबंधक (मानव संसाधन) यांनी कळविले आहे.