बार्शी -  समाजशास्त्रातील संशोधक डॉ.सूर्यकांत घुगरे यांना सोलापूर येथील समाजशास्त्र परिषदेच्या वतीने प्रा.रघुनाथ मस्के यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. मंगळवारी दि.२६ रोजी सोलापूर येथील अनुप प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात हा सन्मानपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी डॉ.अशोक गायकवाड, डॉ.गढवाल, डॉ.पाटील, प्रा.मंगलमुर्ती धोकटे, प्रा.चंद्रकांत कांबळे, प्रा.विटेकर तसेच जिल्ह्यातील अनेक विषयांचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    डॉ.घुगरे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ३ राज्यांतून २९ पुरस्कार तसेच ३ राज्यातून १८ सन्मानपत्र यापूर्वीच देण्यात आले आहेत. डॉ.घुगरे यांनी ३५ ग्रंथांचे लेखन व सहलेखन तसेच विविध सामाजिक विषयांवरील २७५ शोधनिबंध, लेखांचे प्रकाशन, ६० अधिवेशनांत व परिषदांत प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. आशिया, युरोप आणि अमेरिका अशा तीन खंडातील सुमारे बारा वेबसाईटवरील स्वतंत्र पानांवर डॉ.घुगरे यांच्या संशोधन कार्याचे उल्लेख आहेत. बार्शीतील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात ३९ वर्षे प्राध्यापकीय सेवेनंतर नुकतेच ते निवृत्त झाले आहेत. उेखक, साहित्यिक व कवि म्हणून त्यांनी प्रदिर्घ व सातत्यपूर्ण योगदान दिले आहे. समाजोपयोगी सेवा करतांना महाराष्ट्रातील पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांची अनेक माध्यमांतून पेरणी केली. त्यांच्या विविधतापूर्ण शैक्षणिक, संशोधनात्मक, साहित्यीक व सामाजिक कार्यगौरव प्रित्यर्थ समाजशास्त्र परिषदेने सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे.
 
Top