बार्शी - आज समाजाची अवस्था पाहिली तर साठ टक्के समाज बिघडलेला आहे, व्यसनाधिन झाला आहे, कुठलही व्यसन विचारा अनेक व्यसनं आहेत. ज्याला वाईट व्यसनं म्हणतो ते आहेच त्याबरोबरच संपत्ती, सत्ता,संतती हे देखिल व्यसनातील प्रकार आहेत. असे प्रतिपादन ह.भ.प.जयवंत बोधले महाराजांचे पिता ह.भ.प. प्रभाकरदादा बोधले महाराज यांनी केले.   
    बार्शीतील भगवंत मंदिरात मागील बारा वर्षांपासून प्रत्येक श्रावणमासात सुरु असलेल्या जयवंत बोधले महाराज यांच्या प्रवचनाचा अर्थात बोधवाणी सुरु आहे. यावर्षीच्या श्रावणमास प्रवचनमालेच्या सांगता व तपपूर्ती प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ऍड्. जयवंत बोधले महाराज, त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई, हरिभक्त परायण प्रमोद महाराज जगताप,बारामती , बंग महाराज, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड्.दिलीप सोपल, ज्येष्ठ पत्रकार राजा माने आदी उपस्थित होते.
      ह.भ.प.प्रभाकरदादा म्हणाले, बारा वर्ष झाली, फार महत्व, सर्व बारा राशीच्या लोकांना बोधराजाच्या कृपेने बोधवाणी लाभली. प्रवचनासाठी विषय देतांना लक्षात येत, जयवंत महाराजांकडे अनेक पैलू आहेत, अनेक विषयांचा संगृह आहे पण वक्ता आहे त्याला कोणता विषय द्यावा त्यापेक्षा वक्त्याच्या आवडीचा विषय कोणता ते कळाले की अंत:करणातून भरपूर बोलत असतांत. लहानपणापासून मला माहिती आहे विविध विषयांचा अभ्यास केला असला तरी भक्तीशास्त्र हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. म्हणून बारा वर्षांत बारा विषय देतांना भक्ती शास्त्राला संबंधीत विषय काढून दिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेकांचे सहकार्य आहे. जिथं बोध ना तिथं विरोध नाही, जिथं विरोध नाही तिथं क्रोध येत नाही, तिथं सुक्ती विरोध आहे त्या बोधात कधी विरोध नसतो, सत्यबोध आहे विरोध नाही, जिथं क्रोध नही, जिथं क्रोध नाही तिथं प्रमोद (आनंद) आहे. हा अध्यात्मिक आनंद समाजाला खर्‍या अर्थाने सुख समाधान देतो. अध्यात्मिक शक्तीशिवाय समाजाला कोणी काही करु शकत नाही. शासनामध्ये वाटेल ते कायदे कराल परंतु सर्व शासनाचे जे कायदे आहेत ते गुन्हा झाल्यानंतर त्याला काय करायचे, अन गुन्हा साबीत झाल्यावर काय करायचं अशा प्रकारचे कायदे आहेत. पण अध्यात्मिक शास्त्राचा कायदा असा आहे की गुन्हा त्याने करु नये अशा प्रकारचा अध्यात्मिक कायदा आहे. खर्‍या अर्थानं कायद्यानं मनुष्यामध्ये बदल होऊ शकत नाही. वाट्टेल त्या योजना केल्यानं मनुष्यात बदल होत नाही, मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदल पाहिजे, मनोवृत्तीत बदलता आली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाली तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये आहे अन ते अध्यात्मच करु शकतं आणि म्हणून आज समाजाला अध्यात्माची फार मोठी गरज आहे. आज समाजाची अवस्था पाहिली तर साठ टक्के समाज बिघडलेला आहे, व्यसनाधिन झाला आहे, कुठलही व्यसन विचारा अनेक व्यसनं आहेत. ज्याला वाईट व्यसनं म्हणतो ते आहेच त्याबरोबरच संपत्ती, सत्ता,संतती हे देखिल व्यसनातील प्रकार आहेत. याच्या पाठीमागेच समाज लागलेला आहे व बिघडलेला आहे. आणि म्हणून या समाजाला खर्‍या अर्थानं शांती मिळना गेली. चाळीस टक्के समाज थोडा आहे तो कुठं याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मिळावं म्हणून तो विचार करतो पण तोही दिशाहिन आहे, त्याला योग्य दिशा मिळेना झालीय. नेमकं मी काय करायला पाहिजे? माझं चांगलं वागण्याकरिता माझं जीवन स्वच्छ, जीवन सुखी होण्यासाठी काय करायला पाहिजे? असा दिशाहिन समाज झाला आहे. अशा दिशाहिन समाजाला योग्य दिशा देऊ कोण देत असेल तर ते फक्त वारकरी सांप्रदाय देऊ शकतो. आज समाजाला फार मोठी गरज आहे. जीवन कशाला म्हणायचं तर माणूस ज्या जगामध्ये जगतो त्यातील जग यातील ज शब्द हा जन्म, ग शब्द हा गमन (जाणे/मरणे), जिथं जन्म-मरण सातत्यानं चालतं त्याला जग असं म्हणायचं आणि ज पासून ग पर्यंतचा मधला जो काळ आहे नां याला जगणं अथवा जीवन म्हणायलं. हे जीवन कसं जगावं हे जर शिकायचं असेल त्याच्यासाठी अध्यात्माचीच गरज आहे. बाकी सत्ता, संपत्ती, संतती या कुठल्याही गोष्टीच्या प्राप्तीनं जीवन सुखी होऊ शकत नाही. वाटेल ते डोंगराएवढे जरी दु:ख जरी आले तरी ते दु:ख पेलण्याची ताकद त्या अध्यात्मामध्ये आहे. ती अध्यात्म प्रवृत्ती माणसाच्या अंगी आली नां मग बस तुम्ही कोणत्याही प्रकारचा गुन्हा करु शकत नाहीत. त्याच्या मनामध्ये विकार होऊ शकत नाही अन स्वच्छ असं त्याचं हृदय राहतं त्याच्याकरिता आपण गेल्या बारा वर्षांपासून सातत्यानं या प्रवचनांचे आयोजन केले आहे. जे जे आपणासी ठावे ते ते सांगावे आणि सांगोनी शहाणे करावे सकळ जन, जे आपल्याला माहिती असेल ते इतरांना सांगावे आणि त्यामुळे विद्येची वाढ होते. त्याकरिता जयवंत बोधले महाराजांना आपण सतत बोलण्यास सांगीतले आणि त्याबरोबरच कोणतीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेनं करण्यास सांगीतले. अध्यात्मात अलिकडं व्यवहार घुसायला लागला आहे. व्यवहार व्यवहारातच रहावा, अध्यात्म हा व्यवहारात घुसळला तर अगदी उत्तम पण अध्यात्मात व्यवहार घुसळला तर मग मात्र सगळं वाटोळे होते. अध्यात्मामध्ये व्यवहार कधी येऊ नये. व्यवहार करतांना अध्यात्म यावा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वित करी, उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवदशा अशा प्रकारे वागण्यास त्यांना सांगीतले. जयवंत महाराज हे मोठे होण्यासाठी बार्शीतील श्रोत्यांना धन्यवाद द्यावे लागतील. बारा वर्षे झाली परंतु एका तपाने भागत नाही अशी अनेक तपे करणे गरजेचे आहे. तपपूर्ती ऐवजी तपस्फूर्ती म्हटल्यास वावगे ठरणार नाही.       
    याप्रसंगी बोलतांना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तुा जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड्.दिलीप सोपल म्हणाले मागील बारा वर्षांत प्रत्येक वेळी महिनाभर जमले नाही तर एक दिवसाचा तरी आनंद मला लुटता येतो. प्रवचनाचा आनंद लुटणं याची एक मजा असते. महाराजांच्या तपाचं, अनुष्ठानाचं फळ हे बार्शीतील भक्तांना मिळतं, त्यामुळे आनंदाची तपपूर्तीनिमित्त ज्या पांडूरंगाच्या चरणी महाराज नेहमी सेवा करतात त्या पांडूरंगाच्या चरणाला चरणाला जाणारी चंद्रभागा काल आम्ही भगवंताच्या चरणी आणली आहे, उपसा सिंचन योजना अन आज सकाळी त्या पाण्यानं भगवंताची पूजा घातली आज तोही एक योगायोग आहे. आणि असे चांगले योगायोग आपल्या पुण्याई, अनुष्ठान, मार्गदर्शन, वाग्यज्ञानं या तालुक्यात येवोत ऐवढी भगवंतचरणी प्रार्थना अन मागणं मागायचं तर हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप म्हणाले, एखादी पारमार्थीक साधना जेवढ्या सहजतेने सुरु होते, तेवढ्या सहजतेने त्याच सातत्य टिकून राहत नाही प्राय: ती खंडीत होते, परंतु ही प्रवचनमाला सातत्यानं बारा वर्ष टिकून राहीली ती भगवंताची कृपा, एखादी साधना बारा वर्ष झाली की त्याला तप असं म्हणतात. यातून मला काही गवसलं आहे, समोर भगवंत मागे महालक्ष्मी हा जगातला एकवेव भगवंत त्याच्या सन्निध भगवंत आहे. पंढरपूरला नांदतो आहे पण रुक्मिणी शेजारी आहे, इथल्या भगवंताच्या पाठीशी लक्ष्मी आहे हे वैशिष्ट्य आहे. महाराजांनी एक तप केलं यातून काय साध्य झालं तर तप या शब्दाचं उलट वाचन केलं तर पत असा शब्द होतो याचा अर्थ काय आहे, भगवंत प्राप्तीकरिता तप करावं लागतं आणि लक्ष्मीसाठी पत असावी लागते ही जयवंत महाराजांनी कमावली. भगवंतासाठी त्यांनी तप केलं आणि तपाची आज पत झाली, त्यांच्यावर भगवंतासह महालक्ष्मीचा त्यांना वरदहस्त मिळालेला आहे. पाऊस एवढा पडत असतांना मोठ्या संख्येने भक्त हे उपस्थित हे जयवंत महाराजांवरील अप्रतिम आणि अलौकिक प्रेम आहे. प्रेम एखाद्यालाच मिळते, राजकिय सभेला गर्दि करण्यासाठी खूप खर्च लागतो पण इथे तसं नाही. गोपीगीताच्या सांगतेला पर्जन्यगीत गायलं गेलं याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. यज्ञात फलती पर्जन्य: असं गीतेचं मत , तसंच महाराजांचा वाग्यज्ञ सफल झाला त्याची ती साक्ष आहे. यज्ञाअंती पर्ज्यन्य ती यज्ञाची सफलता असते. पंढरपूरला एकादशीला दर्शन आणि द्वादशीला बार्शीला जेवण करुन नंतर घरी जाण्याची वारकर्‍यांची परंपरा आहे, द्वादशी नगरी अर्थात बार्शीमध्ये जयवंत बोधले महाराजांनी तप केले त्यामुळे सार्थक झाले आहे.
 
Top