उस्मानाबाद - महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ,उस्मानाबाद मार्फत सन 2014-15 या आर्थीक वर्षात अनुसूचित जातीतील मुलां-मुलींना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण  देण्यात येणार आहे.  त्यासाठी ईच्छूकांनी शाळा सोडल्याचा दाखला (मुळप्रत), जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (शहरासाठी रुपये 1 लाख तर ग्रामीण साठी 40 हजार), दोन फोटो, रेशनकार्ड झेरॉक्स, रहिवाशी प्रमाणपत्र, दहावी किंवा बारावीचे गुणपत्रक, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड आणि वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज दिनांक 10 सप्टेंबर,2014 पर्यंत (कार्यालयीन वेळेत) महामंडळाच्या कार्याल्यास सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ,उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये केले आहे
 
Top