उस्मानाबाद : तेरणा पब्लिक ट्रस्ट सभासद कारखान्याच्या ताब्यात द्या व तेरणा कारखान्यातील भंगार चोरी प्रकरणी संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तेरणा कारखान्यासमोर दि. २६ ऑगस्ट रोजी जोरदार निदर्शन करण्यात आले.
तेरणा सहकारी साखर कारखाना सभासदाच्या मालकीची तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट घटना बदलुन डॉ.पाटील पुत्राने स्वत:च्या नातेवाईकाच्या ताब्यात घेतला आहे. ती परत तेरणा कारखान्याच्या ताब्यात देण्यात यावी, गैरव्यवहार करणा-यावर कार्यवाही करावी, तेरणा कारखान्याच्या संचालक मंडळाने शेतकरी व कामगाराचे थकीत बिल व पगार दिले नाही.
विद्यमान संचालक मंडळाने कारखानाचे भंगार चोरुन विकले आहे. या भंगारचोरी प्रकरणी विद्यमान संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावे तसेच जिल्हा बँकेच्या राजकीय थकबाकीदारावर पालकमंत्री, आमदारावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करा या सर्व मागण्यासाठी मनसेच्या वतीने ढोकी येथे तेरणा कारखान्याच्या गेटवर जोरदार निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात जिल्हाध्यक्षा वैशालाताई गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश देशमुख , जिल्हा सचिव राजेंद्र गपाट, संजय यादव, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विपीन हौसलमल, अभिजीत पतंगे, गणेश जगताप, प्रमोद वाघमारे, काका गोरे, तालुका उपाध्यक्ष परवेज काझी, मुरली देशमुख, विभाग अध्यक्ष सलिम औटी, सुधाकर घारगे, अच्युत फेरे, बबन पवार, मधुकर ओझ, हनुमंत सावंत, दिनेश कोंडारे सहभागी झाले.
 
 
Top